पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते. सबब, यापुढे कधीही इंदूरला आल्यास हा दिलेला गृहपाठ केल्याशिवाय येऊ नये असा खास सल्ला दिल्याशिवाय रहावत नाही.
आता हेच पहा ना. एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. पण मध्य देशी आल्यानंतर मात्र भय्यात किती विश्व सामावले आहे, याचा अंदाज येतो.
एरवी आपल्याकडे अपरिचित, अल्पपरिचित मंडळींना हाक मारण्यासाठी काका, मामा, दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, ताई, काकू, मावशी, मामी या शब्दांची रास आहे. अगदीच गेला बाजार 'अहो, शूक शूक तुम्ही तुम्ही' यानेही काम भागते. पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही. दादा, भाऊमध्ये ती सर नाही. याउलट भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. पण या शब्दांतल्या भावनांचा अदमास त्याचे उच्चारण समजून कळल्याशिवाय तुम्ही इंदौरात रूळलात असे म्हणताच येणार नाही, महाराजा.
आता तुम्ही इथल्या कुठल्याही चांगल्या-चुंगल्या दुकानात खरेदीला गेलात तर हाच शब्द 'भय्या, जरा वो कपडा दे ना'. म्हणून सोज्वळ रूप धारण करतो. रस्त्यावरच्या पोहेवाल्याकडे, पाणीपुरीच्या ठेलेवाल्याकडे, गल्लीत आलेल्या तरकारीवाल्याकडे नि पानटपरीत राजेशाही थाटात बसलेल्या पानवाल्याकडे हाच शब्द विठ्ठलाला 'विठू' म्हणावे अशा लयदार पद्धतीने 'भिया' असा प्रेमळ होतो. इथल्या ब्ल्यू लाईन बसमध्ये बसून कुठे चालले असलात की त्यातला 'भय्याही' प्रेमळ असतो. पण बस 'नगरसेवा' (खासगी वाहतुकदाराची) असेल तर मग त्यातल्या तिकीटफाडू पंटरच्या तोंडून आपला उच्चार 'भियाव, जरा खिसको ना' असा भ्यावणारा झाल्यास भिऊन जायचे कारण नाही. ही इंदूरी त्र्यागाची 'भियाव' आवृत्ती असते. पण ती इतक्यावरच थांबत नाही. भर ट्रॅफीकमध्ये कुणी धडक मारल्यानंतर झालेल्या भांडणातही हा 'भिया'च कामी येतो. 'भिया, गाडी चला रिया या क्या कर रिया था? या वाक्यासरशी दोन भियातले भांडण पुढे कितीही काळ रंगू शकते. रस्त्यात चालता-चालता किंवा चालवता चालवता तुमचा 'ओ भिया हटो ना' असा उद्धार झाल्याशिवाय तुम्ही इंदुरात असल्याचा फिल अजिबात येणार नाही. शब्द साधा 'भिया' असला तरी त्याच्या उच्चारणाची न्यारी ढब तो 'फिल' नक्कीच देईल.
नात्या-गोत्यातही भय्या असतोच. पण अनेकदा नाती निर्माण करताना तो गोत्यातही आणतो. समवयस्क मुलाला हाक मारताना नाव घेऊन पुढे भय्या लावण्याची ही प्रथा अनेक पोरीबाळींसाठी सोयीची ठरत असली तरी त्या 'भय्या'चा मात्र 'वडा' होतो. पण वय वाढल्याचं अनुक्रमे तुमचे डोईवरचे केस 'दिसत नसल्यासारखे' झाल्यास वा ते पांढर्या रंगाला पर्याय ठरल्याचे वाटताक्षणी तुम्ही 'भाईसाब' म्हणून 'कन्व्हर्ट' होता ते तुमचं तुम्हालाही कधी कळत नाही. भाई या खास हिंदी शब्दाची मुंबई आवृत्ती इथे वापरात नाही, पण त्याचा मूळ अर्थ पकडूनही हा शब्द केवळ नातेनिदर्शक एवढाच उरला आहे. गेला बाजार अगदीच सार्वजनिक कार्यक्रमात आदरार्थी उच्चार म्हणून 'भाई प्रवीणजी', 'भाई दिलीपजी' असे ऐकायला येते. पण तो शब्द जपून ठेवायचा म्हणूनच. बाकी काही नाही.
समवयस्क विवाहित महिला आपल्याकडे वहिनी असतात, इकडे त्यांचे कन्वर्जन 'भाभी' किंवा 'भाभीजीं' मध्ये होत असले तरी त्याहीपेक्षा 'बेहेनजी' ही खास इथली साद ऐकण्यासारखी असते. बायकांचे कपडे विकणार्या दुकानात याचा वापर बराच होतो. पण त्यातही गिर्हाईक गटवायचे या भावनेने पेटलेला दुकानदार 'दिदी दिदी' म्हणूनही रूंजी घालत बसतो. पण हल्ली त्याही पलीकडे 'मेडम' हा शब्द रूळलाय. विशेषतः सहकारी किंवा अनोळखी महिलांसाठी. सायकलवरून जाणाराही समोर स्कूटी घेऊन जाणार्या महिलेला 'मेडम, जरा हटो', किंवा गाडी ठोकल्यास, 'ओ मेडम केसे गाडी चला रही हो', म्हणून पुकारा करेल. काही ठिकाणी या 'मेडम'च्या पुढे 'जी' जोडून भिजलेला आदर दर्शवला जाईल. लिखित भाषेत ही मेडम 'मैडम' अशी अंमळ वाकल्यासारखी दिसते.
आपल्याकडचे 'काका-काकू' इकडे 'अंकल-आंटी' म्हणून उरलेत. त्यामुळे थोड्या मोठ्या पुरूषांना अंकल नि बायकांना आंटी असा सर्रास उच्चार आहे. त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. पण कधी तरी वाहतुकीच्या भर गर्दीत कॉलेज कन्यकांचा अडसर होत असला की 'आंटी, बाजू हटो' म्हणून कधीचा तरी सूड कुठे तरी नि केव्हा तरी अखेर उगविण्याची संधी मिळते. उगाचच 'आंटी' संबोधून समोरचीच्या चेहर्यावरचे बदलते भाव पाहून, त्याला अजिबात भाव न देण्याइतकी इंदौरची नवी पिढी सोकावलीय. पण तरीही 'आंटी मत कहो ना, असा लाडीक स्वर सहसा कुठे ऐकल्याचे आठवत नाही. एकुणात सध्या या अंकल नि आंटीचा आख्ख्या इंदौरमध्ये उच्छाद आहे.
दुकानदारी भाषेतले काही शब्दही खास आहेत. आपला माणूस इथे 'अपना आदमी' होतो, पण त्याहीपेक्षा 'अपना बंदा आएगा, सम्हलके लेना' हा उल्लेख खास इथला आहे. हा 'बंदा रूपया' इथल्या व्यावसायिक कट्ट्यावर टण्णकन आवाजानिशी आदळला नाही, तरच नवल. मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. एखाद्या 'चाय'च्या 'गुमटी'वर गेल्यास तिथल्या 'पिंट्या'ला 'बालक' होतो. 'ए बालक, इधर आ' अशी हाक आपसूक निघून जाते.
आणि हो, इकडे आलात तर महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. एरवी मराठी धाटणीचेच भाषांतरीत हिंदी रेटून नेऊन बोलण्याच्या मराठी सवयीला असाच योगायोगाने चाप बसला. आमचा एक मित्र खरेदीसाठी कपडा बाजारात गेला. खरेदी करता करता त्याने 'काका' या मराठी शब्दाचं भाषांतर करून 'चाचा, कुछ किमत कम करो' असं फर्मान सोडलं. झालं. समोरच्या दुकानदाराचं टाळकं सणकलं. चाचा? संतापून तो म्हणाला? मै क्या चाचा दिखता हूँ' इकडे मित्र गार. त्याला कळेचना. हा का चिडला ते? दुकानदाराचा संताप गळणे सुरूच, ' आपने दुकान नहीं देखी? महावीरजी का फोटो नही देखा? बाकी सारे जैन मुनियोंके फोटो नहीं देखें' तरीही मित्राचा डोक्यात काही शिरेचना. त्याने विचारलेच, लेकिन मैने गलत क्या कहा? तोपर्यंत त्या दुकानदाराला अंदाज आलेला की 'बेणं' बाहेरचं दिसतंय. तो म्हणाला, भाईसाब, यहॉं चाचा मतलब मुसलमान आदमी को बोलते है. मै जैन हूँ. समझे? मित्राच्या ज्ञानात भर पडली. शिवाय नको तिथे संबोधनांचे भाषांतर करणे टाळा हा धडा मिळाला.
हे झाले हिंदी बांधवांचे. आपल्या मराठमोळ्या मंडळींही 'सावध ऐका पुढल्या हाका' अशीच आहेत. इथल्या मराठी बांधवांची हिंदीवगुंठीत मराठी नात्यांची संबोधने जणू सराफ्यातल्या रसोत्पादीत जिलेबीचा थाट घेऊन तोंडातून टपकतात. आणि मग 'काका, मावशी के लिए मेसेज है', काकू आपको आईने हल्दीकुंकू के लिए बुलाया है'. 'मामा, तुम मामी को लेकर आओ, मैं आजी के साथ हूँ ही हिंदीच्या पुडीतली मराठी संबोधने ऐकायलाही मजा येते.
आताशा ही संबोधने आमच्याही 'कानवळणी' पडलीत. या संबोधनातली वळणेही आता जाणवू लागली आहेत नि त्याला प्रत्त्युतर करण्याची भाषाही आडवळणाने का होईना समजू लागली आहे. म्हणूनच रस्त्यावर सवयीप्रमाणे मध्येच गाडी घालून रस्ता तयार करण्याची खास इंदौरी प्रथा पाळणारा गाडीस्वार आला, की 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज', अशी इंदौरी भाषा तोंडातून बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही.
आमच्या इंदौरी झाल्याचा आणखी काय पुरावा द्यायला हवा काय? चला भय्या, थांबतो आता, सराफ्यात जाईन म्हणतो.
Showing posts with label अनुभव. Show all posts

Friday, March 26, 2010
Monday, January 18, 2010
पिंडीभोवतीचं 'ब्रह्मांड'! (2)
पहिला भाग
उज्जैनला महांकालेश्वराच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुढे....
पुढे गेल्यानंतर उंच घुमट असलेली वास्तु लागली. इथेही रेलिंग होते. पण एका क्षणी पंधरा ते वीस फुटांवरून महंकालेश्वराचे दर्शन घेता येत होते. या रेलिंगच्या पलीकडे थोडी मोकळी जागा. तिथे नंदी आणि त्याच्यासमोर असलेल्या खोलीत महंकालेश्वराची पिंड असा मामला होता. एरवी गर्दी नसताना थेट तिथपर्यंत जाऊन दर्शन घेण्याची सोय असते. पण आज गर्दी असल्याने थेट पिंडीपर्यंत प्रवेश वर्ज्य होता. त्यामुळे लांबूनच दर्शन घेणे क्रमप्राप्त होते. नेहमीप्रमाणे भाविकांनी इथे रांग मोडून देवाच्या जास्तीत जास्त जवळ कसे जाता येईल, याची काळजी घेतली. त्यामुळे ढकलाढकली, खेचाखेची, धक्काबुक्की, आरडाओरडी, गोंधळ नि कोलाहल अशा अवस्था क्रमशः गाठल्या गेल्या.
समोरच्या रिकाम्या चौकात असलेले पिवळी वस्त्रे परिधान केलेले पुजारी या गोंधळाला आवर घालण्यसाठी 'आरडाओरडी'चे हुकमी अस्त्र वापरत होते. भाविकांकडून आणल्या गेलेल्या थाळ्यांवरील हार, नारळादी वस्तू उचलून घेऊन त्या महादेवचरणी वाहण्याची व्यवस्था पाहणारी पुजारी मंडळी अर्थातच तोर्यात होती. बाजू हटो, आगे बढो, आहिस्ते, सबको दर्शन लेने दो या त्यांच्या प्रचलित वाक्यसमुहांचा मुबलक वापर होत होता. इकडे पुजार्यांनी भाविकांचा हार-फुलादी 'भक्तीभाव' पिंडीवर वाहिल्यानंतर तो तत्परतेने उचलून दुसरीकडे टाकण्याचा व्यवहार्यभाव पाहणारी पुजार्यांची दुसरी फळी मंदिराच्या मुख्य खोलीत कार्यरत होती.
मंदिरात इतरांसाठी प्रवेश निषिद्ध असला तरी काही मंडळी मात्र आत दिसत होती. त्यांची 'उंची' कपड्यांतून, आचरणातून, व्यवहारातून नि अनेक बाबींतून कळत होती. आमच्या जत्थ्यातल्या काकूंचा भलताच हिरमोड झाला होता. त्यांना आत जाऊन देवदर्शन करायचे होते. पण ते शक्य नव्हते. आम्ही इतर अनेकांप्रमाणे आत शिरता येईल काय याची चाचपणी केली परंतु, त्यातून दुर्लक्ष करणे, धुत्कारणे, झिडकारणे या वृत्तींची नवी उदाहरणे कळाली.
तेवढ्यात देवाची आरती झाल्याची वार्ता कापराच्या वासाने दिली. सहाजिकच ती आरती घ्यायला लोकांची गर्दी झाली. दुसर्या थाळीत प्रसादही होता. जत्थ्यातल्या आमच्या एका सौभाग्यवतीच्या चिमुकल्या चिरंजीवाने त्या थाळीतील वाटपासाठीच चालवलेला प्रसाद स्वहस्ते उचलला नि मग कपाळावरची उजवी शिर तडतडून पुजार्याने 'देवाघरची फुले' असलेल्या त्या मुलाच्या मातेला 'पुत्रसंस्काराचे' धडे दिले. तेवढ्याशा त्या शाब्दिक माराने त्या मातेला अश्रू आवरेनासे झाले.
अखेरीस लांबून का होईना दर्शन पार पडल्यानंतर जत्था सभागृह मंडपातून बाहेर पडला. बाहेरही अनेक मंदिरे थाटलेली होती. ही मंदिरे बर्यापैकी ऐसपैस जागेत होती. त्यात एक मंदिर विठ्ठलाचेही होती. तिथे आल्यानंतर आजूबाजूला मराठी आवाज तेवढे ऐकू आले. बाकी मंदिरातही बरीच गर्दी होती. इथून सगळी दर्शने करून आमचा जत्था अखेरीस मंदिराच्या बाहेर पडला.
दर्शन करूनही ते जवळून न झाल्याने काकूंचा झालेला हिरमोड चेहर्यावर दिसत होताच. सहलसंयोजकाने इच्छामणी गणपतीचे दर्शन आधी घेतले असते तर थेट आतपर्यंत जाऊन दर्शन घेता आले असते. आपण आधी इथे यायला नको होते, अशी पश्चातभावना व्यक्त केली. आणि मग हा सगळा जत्था इच्छामणीच्या दर्शनाला गेला. तिकडून मग मंगलनाथ, भैरवनाथ अशी मंदिरे करत संध्याकाळपर्यंत उज्जयिनी नगरिला प्रदक्षिणा घालत पुन्हा महांकालेश्वराच्या प्रांगणात अवतरला. तिथे गेल्यानंतर मंदिरात गर्दी नसल्याची सुखद वार्ता कळली. तातडीने सगळ्यांनी मंदिराकडे धाव घेतली.
आता सगळी सर्पिलाकार वेटोळी मिटली होती. प्रवेश केल्यानंतर कुठेही न थांबताच सगळी मंडळी थेट मंदिराच्या आत जाऊन पोहोचली. पायीची वाट थेट महांकालेश्वराच्या गाभार्यातच पोहोचली. समोर महांकालेश्वराचे शिवलिंग. त्याच्याभोवती योनीपटल. सर्पाने छानपैकी फणा पसरलाय. आणि त्या सगळ्यावर पुजारीवर्ग डोलतोय. असा सारा माहौल होता. आतले दृश्य अगदी रमणीय होते. काही भाविकांनी पिंडीलाच मिठी मारली होती. काहींनी भक्तीभावाने पिंडीजवळ डोके ठेवले होते. हलवल्याशिवाय ते वर उचलण्याची तसदी ते अजिबात उचलत नव्हते. काही जण आणलेल्या वस्तू वाहत होते. काही जण अभिषेकाला बसले होते. काही जप करत होते. प्रत्येकाच्या भक्तीभावनेला तोंड फुटले होते.
गर्भगृहात मोजकीच मंडळी होती. पण पुजारी मंडळी आपले अस्तित्व विसरू देत नव्हती. दक्षिणांच्या नोटेवरून त्यांचे आवाज ठरत होते. काहींचे अभिषेक त्यांच्या मार्फत सुरू होते. त्याच्या मंत्राचे आवाज येत होते. काही जणांनी मध्यस्थाविना पुजा चालवली होती. काही जप करत होते. आमच्या जत्थ्यातल्या काकू महांकालेश्वराचे रूप पाहून हरखून गेल्या होत्या. पुजार्यांचे आवाज ऐकल्यानंतर त्यांनी शंभराची नोट काढली नि वाहिली. ती नोट नि हातातली जपाची माळ पाहताच पुजारीबुवांनी त्यांना जपासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचा जप सुरू झाला. आम्ही निवांतपणे दर्शन घेतले. पुजारी बुवांची पुजा चालली होती. लोक येत होते. दर्शन घेत होते.
आता गर्दी खूपच कमी झाली होती. सगळ्यांची दर्शने आटोपली होती. काकूंचा जप संपला होता. निश्चिंत नि निवांत भावाने त्या जप आटोपून पिंडीसमोरच्या मोकळ्या जागेत बसल्या. दर्शनाने त्या तृप्त झाल्या होत्या. सहल संयोजकाने आठवण करून दिली, 'यह इच्छामणीका प्रसाद है. उसका दर्शन लिया और महांकालेश्वरके अच्छे दर्शन हो गए.' त्याच्या म्हणण्याला उगाचच होकार भरत आम्ही त्याच्या चेहर्यावरच्या तृप्त गोलाई वाढवली. दर्शन झाले. दिवसभराची कटकट, तगमग, वसवस, तडतड अशा अनेक द्वि दुरूक्त शब्दांच्या भावनांचा अंत 'याचसाठी केला होता अट्टाहास' या भावनेने झाला ही समाधानानाची बाब.
इत्यलम.

पिंडीभोवतीचं 'ब्रह्मांड'! (1)
उज्जैनला पोहोचलो तेव्हा दुपारचे दीड-दोन वाजले होते. महांकालेश्वराच्या मंदिराच्या परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये आमच्या गाड्या पोहोचल्या नि सुटीच्या दिवशी देवाची आठवण होणारे फक्त आपणच नाही, हे जाणवून तोपर्यंत उगाचच जाणवलेला अपराधभाव दूर झाला. गाड्या सुयोग्यजागी पार्क करून आमचा जत्था मंदिराकडे निघाला. मंदिरात देव सापडतो पण चप्पल हरवते, हे अनुभवांती बनलेले सुभाषित आठवून सुरक्षित ठिकाणाचा शोध सुरू असतानाच आमच्या सहल संयोजकाने एका दुकानासमोर आमच्या जत्थ्याला उभे केले. दुकानात चपला ठेवण्याच्या मोबदल्यात 'सजवलेली' थाळी तयार होतीच. पण आमच्या जत्थ्यातल्या बायकांनी निग्रहाने त्यातल्या अनेक वस्तू कमी करून चपला सांभाळायसाठी किमान पैसे खर्च होतील, याची काळजी घेतली. दुकानदारीण बाईचा नाराज चेहरा दिसत होताच. पण तरीही त्यांनी आम्हाला दुकानातून मंदिराच्या परिसरात सोडण्याचा खुष्कीचा मार्ग दाखवला.
अर्थात हा मार्ग थेट मंदिरात जात नव्हताच. प्रसिद्ध मंदिरात दर्शनाची सर्पिलाकार व्यवस्था असतेच. हे तर महादेवाचे मंदिर त्यामुळे त्याच्या गळ्यात पडलेल्या सर्पाने भाविकांसाठीही वेटोळे टाकले होतेच. पण हे सापाचे शेपूट दिसत होते तेवढेच नव्हते. एक टप्पा सहजी पार केल्यानंतर इमारतीत प्रवेश केला नि भल्या मोठ्या सभागृहात रागांची अनेक वेटोळी असल्याचे दिसून आले.
भक्तांचा 'जमावडा' चांगलाच होता. आमचा जत्था भक्तीभावाने हात-पाय धुवून तिथपर्यंत आला. ही गर्दी पाहूनच आज दर्शन लांबूनच घ्यावे लागणार याचा अंदाज आला. उभे रहाण्याच्या निरनिराळ्या तर्हा येथे पहायवायस मिळाल्या. काही जण रेलिंगला टेकून उभे राहिले होते. काहींनी त्याच्यावर बसणे पसंत केले. काही जण रेलिंग दोन्ही हातांनी पकडून काय काय व्यायाम तेवढ्या वेळात करता येईल याचा अदमास घेत होते. काहींनी एका पायावर उभे राहू बाई दुसर्या पायावर उभे राहू', असला प्रकार चालवला होता. शरीराची जाडी अंमळ जास्त असलेल्या काही बायकांनी 'सरणार कधी रांग, कुठवर साहू भार 'पायी' अशी अवस्था झालेली. त्यातल्या काहींनी सरळ जमिनीवर बसकण मारली होती. त्याच्या जोडीला इतरही बायकांनी पार जमवला. काहींच्या हातातल्या दर्शनासाठी घेतलेल्या थाळ्यांतील साखरफुटाण्याच्या पुड्याही फुटल्या.
तोपर्यंत पुढे असलेली गर्दी इंचाइंचाने मार्गक्रमण करत होती. मंदिराच्या आवारातच असल्याने भाविकांच्या भक्तीला पारावारही उरला नव्हता. परिवार असला की पारावार जास्त येतो असे कुणीसे सांगितल्याचे आठवले. शिवभक्तांचा हा परिवार बराच मोठा असल्याने 'बम बम भोले', भोलेनाथ की जय अशा अनेक महादेवाच्या संबोधनांचे द्वि,त्रि,चतुर्थ शब्दी उच्चार नि जय हे अंत्यशब्द असलेल्या अनेक घोषणांचा जागर होत होता. त्या जोडीला अनेक महिला कसलेसे स्तोत्र किंवा प्रार्थना पुटपुटत होत्या. या सगळ्या कोलाहलातच 'माला हे पायजे' छापाचे हिंदी भाषक आवाजही येऊ लागले होते. त्याला दरडावणारे सूरही ऐकू येत होते नि या दरडावण्याला हमखास गुडघ्यावर टेकायला लावणआरे रूदनाचे विविध पट्टीतले प्रतिसूरही ऐकू येऊ लागले.
या सगळ्यांतून आपले लक्ष त्या महादेवाचरणी नेण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाने भिंतीच्या माध्यमातून कसोशीने केलेला दिसला. भिंतीवर लिहिलेले महांकालेश्वराचे महात्म्य हे काहींच्या दृष्टीने वेळ घालविण्याचा उद्योग होत असला तरी दर्शनास जाईपर्यंत निर्माण होणारा भक्तीभाव द्विगुणित करण्याची व्यवस्थापनाची चतुर युक्तीही जाणवत होती. या भित्तीलेखात तुलसीदासाच्या रामायणातील महादेवाला लागू पडतील अशी वचने सचित्र दिली होती. त्या वचनातील मध्ययुगीन हिंदी ही अंमळ आम्हा मराठीयांसाठी नेहमीप्रमाणे उगाचच विनोदाचा विषय बनली. पण चित्रे नक्कीच वेधक होती. रांगेतल्या मंडळींचा वेळ कारणी लागावा यासाठी त्या चित्रकाराने भलतेच कष्ट घेतले होते. या महांकालेश्वर महात्म्यात अनेक कथा दिल्या होत्या. त्यात मंदिरातचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'प्राचीन', एकमात्र हे शब्द वापरण्याची अर्वाचीन परंपरा न चुकता पाळली होती.
महादेवावरची भक्ती सभागृहात ठायी ठायी पेरलेली होती. देवदेवतांच्या तसबीरी, घड्याळे, पाण्याची भांडी, भित्तीचित्रे यातून ती डोकावत होती. या दानी मंडळींची नावेही आवर्जून लिहिली होती. त्यानिमित्ताने महांकालेश्वराचे भक्त देशाच्या कोणकोणत्या भागात आहेत, याची कृतज्ञ जाणीव होत होती.
तेवढ्यात बम बम भोलेचा जोरदार गजर जाला नि 'साचलेली' गर्दी अचानक फुटली. लोकांना अडवून बसलेल्या पोलिस मामांनी हिरवा झेंडा दाखवल्याने हा लोट पुढे सरकला. उतारावरून घरंगळत ही गर्दी मंदिराच्या मुख्य इमारतीत झेपावली. तिथे ठेवलेल्या धातूशोधक यंत्रातून पार होत आम्ही पुढे सरकलो. पुढे अनेक कोनाड्यांत विविध देवदेवतांची प्रतिष्ठापना केली होती. त्यावर भरपूर हार-फुले वाहिलेली होती. दानपेटीही अर्थातच होती. त्यात वर दिसतील अशा दहा, पन्नास, शंभराच्या नोटाही दिसल्या. थोडक्यात एका महांकालेश्वराच्या निमित्ताने या बाकीच्या देव मंडळींचे पर्यायाने त्यांच्या ‘पालकां’चे छान चालले होते. ‘तर-तम’ भाव म्हणजे काय हे इथल्या पुजार्यांकडून दिल्या जाणार्या प्रसादातूनही कळून येत होते.
याच ठिकाणी उजव्या बाजूला पुरोहितही बसले होते. शांती, पूजा, अभिषेकादी कार्ये येथे केली जात होती. पुजारी मंडळी आर्जवाने भाविकांना बोलवत होती. अनेक भाविक मंडळींनी त्यांच्या या आर्जवाला खरोखरच आपली ‘मान’ दिली होती.
आमचा जत्था मात्र निग्रहाने हे आग्रह ओलांडून पुढे गेला......
क्रमशः
Saturday, January 9, 2010
पाव मार्काचा धडा !
एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं.
हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले.
कशाबद्दल? आईचा प्रश्न.
'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली.
मग ठीक आहे. त्यात काय एवढं?
एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली. वर्गपाठाच्या त्या वहीत शाळेत तिच्या 'टीचर' सराव घेतात. मुलांकडून हा सराव करून घेतला जातो. त्यानुसार त्या दिवशी हिंदीतली स्वराक्षरे लिहिण्याचा सराव होता.
त्यानुसार लेकीने 'अ आ इ ई.... ' अशी सगळी अक्षरे नीट लिहिली होती. पण तिच्या शिक्षिकेने तिचा दहापैकी पाव मार्क कापला होता. बाकी सगळ्यांना दहा मार्क मिळाले असताना माझ्या लेकीला मात्र ९. ७५ मार्क्स मिळाले होते.
तिच्या आईने पाव मार्क कापण्याचं कारण काय? असं विचारल्यानंतर मुलीने तिला वही दाखवली.
हिंदीमध्ये 'औ'वरच्या दोन्ही मात्रा शेवटच्या कान्यातून निघणार्या असाव्यात अशी तिच्या शिक्षिकेची अपेक्षा होती. पण घरी अभ्यास घेताना आपण मराठीत लिहितो, त्याप्रमाणे लेकीने 'अ'च्या दांडीतून एक आणि दुसर्या कानातून एक अशा दोन मात्रा दिल्या होत्या. पण त्या चुकीच्या असे सांगून तिच्या शिक्षिकेने हा पाव मार्क कापला. त्यांच्या मते दोन्ही मात्र शेवटच्या कान्यातूनच वर जायला हव्यात.
कशीबशी समजूत घालून नि तिचं लक्ष दुसरीकडे वेधून तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न तिच्या आईने केला. चार तासांनंतर मी घरी आल्यानंतर त्या पाव मार्काचे माझ्या पुढेही आवर्तन झाले. तोपर्यंत ते तिच्या डोक्यात धुमसत होतेच.
'औ'ची मात्रा पहिल्या काय किंवा शेवटच्या काय कुठल्याही कान्यातून निघाल्याने अक्षराचा, शब्दाचा अर्थ बदलला नक्कीच नसता. पण अचूकतेच्या नादात किंवा ती चूक मार्कांतून दाखविण्याच्या नादात त्या कोवळ्या मनावर किती परिणाम झाला या भावनेनेच मी हेलावलो. दहापैकी पाव मार्क मिळाला नाही आणि इतरांना तो मिळाला याचं दुःख तिला सहन होत नव्हतं. वास्तविक तिला अमुक मार्क्स मिळावेत या अट्टहासाचे आम्ही नव्हतो नि नाहीत. पण स्पर्धेचा भाव तिच्या मनात मात्र नक्कीच होता. व्यवस्थेने चार वर्षाच्या वयातच तिच्यात निर्माण केला होता.
ज्युनियर केजीमध्ये जाणार्या माझ्या मुलीला कमी मार्क मिळाल्याचे दुःख नि त्यामुळे येणारा ताण एवढा असेल तर गेल्या काही दिवसांत आत्महत्या केलेल्या त्या उमलत्या कळ्यांवरचा ताण किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. तो सहन न झाल्यामुळे या कळ्या फुलण्याच्या मार्गावर असतानाच कोमेजल्या. हुशारी मोजण्याची मार्काधारीत मोजपट्टी या ताणाला जन्म घालते. ही पद्धती बदलून एखाद्याची सृजनशीलता, हुशारी मोजण्याचा नवा निकष आपण तयार करू शकणार नाही काय? या मुलांना आपण असेच ताणाखाली राहायला लावणार काय? शिक्षण हे पुढच्या जीवनाला आधार देणारे, बळ देणारे असावे ते बलहीन करणारे नसावे यासाठी काय करता येईल? हे आणि असंख्य विचार आमच्या डोक्यात पिंगा घालू लागले.
तिकडे आई-बाबांपाशी रिती होऊन माझी मुलगी झोपी गेली पण, तिचा तो पाव मार्काचा धडा आम्हाला मात्र खूप काही शिकवून गेला...

Sunday, September 20, 2009
भाषा इंदूरी
इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे. म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे आ रीया, कहॉं से जा रीया होतं. इथला सामान्य माणूस याच भाषेत बोलतो. हे ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यांना काहीही वाटत नाही. हिंदी भाषक दुसर्या प्रदेशातून आलेल्यांनाही इथलं हिंदी विचित्र वाटतं. कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. स्त्री असो की पुरूष सगळे असंच बोलतात. इथे आल्यानंतर तुम्हाला उद्देशून 'भीय्या' म्हटलं तर 'भ्याव' वाटू देऊ नका. हा भय्या या शब्दाचा इथला खास इंदुरी उच्चार आहे. तेच भौत भूख लगी है असे कुणी म्हटल्यानंतर भूत पाहिल्यासारखे दचकू नका. बहूतला दिलेला हा भौत टच इंदुरी आहे.
इंदुरमध्ये पोहे 'भयानक' फेमस आहेत. आपल्याकडे जसा मिसळपाव यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तसे इथे पोह्यांचे आहे. हे पोहे मागताना 'एक पोहा देना' असं म्हणावं. आपल्याला कंटाळा येतो तसा इथल्या लोकांना 'कंटाला' येतो. माळवी आणि निमाडी बोलीचाही इंदूरच्या बोलीवर प्रभाव आहे. निमाड हा भाग इंदूरला लागून असलेला त्यामुळे या भाषेचा इथे प्रभाव, तर इंदूर माळव्यातच मोडत असल्याने ती तर इथली स्थानिक भाषा. या सगळ्या मिश्रणाने इथल्या बोलीला एक खास 'टेस्ट' आहे. तुम्हाला शेजारी बसायला जागा पाहिजे असेल तर 'जगो' है क्या असे विचारले गेले तर चमकून पाहू नका. जगहचा 'जगो' हा खास निमाडी बाज आहे.
इथल्या हिंदीची जशी वेगळी चव तशीच मराठीचीही आहे. माळव्यातील मराठी बोली भन्नाट आहे. येथील लोकांच्या मराठी बोलण्यात हिंदी शब्द येणं ही 'आम' बात आहे. येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. इंदूरमध्ये मराठी भागात पत्ता शोधत असताना 'थोडं पुढे जाऊन डावीकडे 'मुडा' असं ऐकू आलं नाही तर आश्चर्य वाटू देऊ नका. एकारान्ती क्रियापदांची इंदूरी आवृत्ती खाशी आहे. म्हणजे जाईल्ले, करील्ल्ये खाईल्ल्ये, अशी क्रियापदे नीट लक्ष देऊन ऐकली तर ऐकू येतात. जाशील ना, करशील ना या प्रकारच्या अंत्य शब्दांचा वळणदार पण छान वाटणारा उच्चारही येथील लोक करतात. इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. म्हणजे नहीं करेंगेच्या तालावर 'नाही करणार' असं म्हटलं जातं. असंच नाही आहेचं, आहे नाही होतं. वास्तविक हे इथे लिहिण्यापेक्षा ते ऐकण्यात मजा आहे.
आणखी एक बाब. इथल्या मराठी घरातील नाती मराठीच आहेत. त्याचे हिंदीकरण वा आंग्लीकरण झालेले मला तरी दिसले नाही. त्यामुळे पप्पा, मम्मी, डॅडीऐवजी शुद्ध, आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी हेच शब्द येथे वापरात आहेत.
या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल.
माय, मावशी नि माझी लेक!
जैसी हरळामाजी रत्नकिळा
की रत्नांमजी हिरा निळा
तैसी भाषांमाजी चोखळा
भाषा मराठी
फादर स्टिफन्स या पोर्तुगीज माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता. तिला हवं ते करून देत मी निमूटपणे 'भाषांमाजी साजिरी
मराठिया' च्या हिंदी अवतारावर विचार करत बसलो.
सव्वादोन वर्षाच्या इंदूरी वास्तव्यात आमच्यापेक्षा आमच्या कन्येने मराठीच्या या मावशीला आमच्यापेक्षा जास्त आपलेसे केल्याचे लक्षात आले. सुरवातीला आम्ही महाराष्ट्रातून आलेलो, म्हणजे आमचे मराठी म्हणजे 'नेटिवां'पेक्षा खासच अशी एक उगाचच मिजास स्वभावात होती. कन्येने ती मिजास उतरवून टाकण्याचा पार विडाच उचलला. याची खरी सुरवात झाली ती शाळेत जायला लागल्यावर. तिने हिंदी चांगले बोलावे ही आमची अपेक्षा होतीच, पण मराठीत हिंदी शब्द यायला नको असं आम्हाला आपलं वाटायचं. (इंदुरी मुलांसारखं आपली मुलगी 'हिंमराठी' बोलायला नको अशी खाज उगाचच मनात असावी!) तिच्या आधीच्या नर्सरीत मराठी भाषक लहान मुले होती. पण प्रामुख्याने बोलणे हिंदीतच व्हायचे. मग हेच हिंदी शब्द तिच्या मराठीच्या हद्दीत येऊन घुसखोरी करायला लागले. सुरवातीला भातात खडे लागल्यासारखे लागायचे, पण आता या भाताचीही आम्हाला सवय झालीय. व्हॅनवाल्या 'शंकरभय्या'पासून ते शाळेतल्या 'मॅम'पर्यंत आणि सगळ्या फ्रेंडसोबत आमची कन्यका हिंदीत सराईत संवाद साधते.
त्यांच्याशी बोलताना हिंदी छान बोलणारी आमची कन्या आता आमच्याशीही हिंदाळलेल्या मराठीत बोलायला लागलीय. 'बाबा चिल्लाऊ नकोस' असं एकदा माझ्यावर ओरडल्यानंतर मी गप्प. काय बोलणार? ती शाळेत जाण्यासाठी 'तैय्यार' होते. डिस्नेवरच्या आर्ट एटॅकसारखं ती काही तरी फरशीवर करते नि म्हणते 'बाबा बघ, मी कसं 'शेहर' बनवलं.' 'आई, मला गोदीत घे ना' असं म्हटल्यावर तिच्या आईलाही आपल्याला धरणीने गिळंकृत करावंसं वाटतं. ती आमच्याशी चर्चा नाही 'गोष्टी' करते. मैत्रिणींशी 'बातें' करते. लपाछपीत ती 'छुपून' बसते. तिला 'गर्मी' होऊन 'पसीना' येतो. 'चिडियाघर'मध्ये गेल्यानंतर 'शेर' तिला 'डरावना' वाटतो. 'बंदर' पाहून मजा वाटते. भिंतीवर 'चिपकली' असते. ती शाळेत नाही, 'स्कूल'मध्ये जाते. तिला 'पढायचं' असतं.
या घुसखोरीपर्यंतही ठीक आहे, पण मराठी शब्दांनाही ती हिंदीचा आधार देऊ लागलीय. हिंदीत प्रत्येक शब्द वेगळा असतो, तिथे प्रत्यय नावाची भानगड नाहीये. त्यामुळे कन्येनेही तिच्या मराठी बोलण्यातले बरेचसे प्रत्यय उडवून लावलेत. ती गाय'ला' पोळी घालते, गायीला नाही. 'चोर'ला पकडायला पाहिजे, असं ती म्हणते. हा 'वाला' तो 'वाला' असं म्हणणारी माझी लेक 'लालवाला स्कर्ट पेहनायचाय' असं सहज म्हणून जाते.
खरी गंमत तिचा अभ्यास घेताना होते. तिला गोष्ट तीन भाषांमध्ये सांगावी लागते. मराठी भाषांत शिकलेल्या आम्हाला तिला गोष्ट सांगताना भयंकर शाब्दिक फरफट करावी लागते. ती जाते, इंग्रजी माध्यमात. पण तिथे 'मॅम' समजावून सांगतात, ते हिंदीत. आणि आम्ही घरी बोलतो मराठीत. पण गोष्ट सांगताना तिच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या तोडक्यामोडक्या हिंदीचाच आधार घ्यावा लागतो. अनेक शब्द आठवावे लागतात. मराठीला पर्यायी हिंदी शब्दांचा पाठलाग करून त्यांना पकडावे लागते. कोल्हा म्हणजे की 'भेडिया' चमकादड म्हणजे वटवाघूळ, उल्लू म्हणजे घुबड हे लक्षात ठेवावं लागतं. तिला गोष्टीही खरगोश-कछुवा, चुहा- बिल्ली यांची सांगावी लागते.
तिच्या अभ्यासात येणार्या शब्दांकडेही नीट लक्ष द्यावं लागतं, नाही तर आमचीच एखाद्या गाफिल क्षणी विकेट उडण्याची शक्यता असते. आम्ही अ अननसाचा शिकलो होतो. आ आईचा होता. पण तिच्या शाळेत अ अनारचा, आ 'आम'चा इ इमलीचा आणि ई 'ईख'चा( उस) असतो. तिची बाराखडीचीही गाणी आहेत. 'अम्मा आई आम लायी..' हे सुरवातीच्या शाळेतलं गाणं आता आणखी वेगळं झालंय. 'अ अनार का मीठा दान आ आम को चूसके खाना' असं झालंय. 'एडी ढोलो ऐनक ले लो, ओखली में मूसल कांड, औरत ने फिर पकडा कान' यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आम्हाला समजून घेऊन तिला सांगायला लागलाय. आमच्या लहानपणीची गाणी तिला आम्ही शिकवलीय, पण ज्या गाण्यांचा पगडा तिच्यावर बसलाय अर्थातच ती हिंदी आहेत. कारण ती शाळेत घोकून घेतली जातात. 'खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा' म्हणणारी माझी कन्या आता 'लकडी की काठी काठी पे घोडा' सहजपणे म्हणून जाते. मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय. 'कोरा कागद निळी शाई' म्हणणार्या आम्हा आई-बापांची ही लेक खेळातही हिंदी गाण्यांवर 'झुमते'. 'अटकन मटकन दही चटाकन, राजा गया दिल्ली, दिल्ली से लाया बिल्ली, बिल्ली गई लंडन' 'ओ मीनो सुपर सीनो, कच्चा धागा रेस लगाओ' ही सध्या तिची खेळातली गाणी.
एका अरूंद पुलावर दोन बकरे आले आणि भांडता भांडता दोघांनी पलीकडे जाण्याचा उपाय शोधला ही गोष्ट ' एक सकरे पुलपर दो बकरे' अशी हिंदीत आहे. कन्या सांगत असतानाच त्याचा अर्थ कळला, पण दहावीपर्यंत हिंदी विषय असूनही 'सकरे' म्हणजे अरूंद हे समजायला मुलगी हिंदी माध्यमाच्या शाळेत जावी लागली.
तिच्या हिंदीतले शब्दच फक्त मराठीत घुसखोरी करतात असं नाही. तर हिंदीची वाक्यरचना तिच्या मराठीत डोकावते. म्हणूनच जाईल्ले, करील्ले, खाईल्ले हे उच्चारही तिने नकळत आत्मसात केले आहेत. शिवाय 'गडबड होऊन जाईल, 'गोष्टी करून घे' 'मी तर तैय्यार झाले', अशी हिंदीच्या चालीवरची मराठी वाक्येही ती बोलून जाते.
पण आता या सगळ्याची आम्हाला सवय झालीय. मराठीचा आग्रह आम्ही सोडलाय. तिला मराठी यायला हवं हे नक्की. पण आम्ही जसं बोलतो तसं ती कसं बोलेल? दोघांची बालपणं वेगळ्या वातावरणात गेली. त्यातला फरक असा मिटवता येणार नाही याचीही कल्पना आलीय. एक मात्र नक्की तिचं हिंदी उच्चारणही अगदी इकडच्यासारखं टिपीकल होतंय. आमची मात्र हिंदीची झटापट अजूनही सुरूच आहे. हिंदी बोलताना येणारा मराठी लहेजा लपवू म्हणता लपत नाही. आणि मुलगी मात्र मावशीच्या कडेवर बसून जगाच्या खिडकीबाहेर नजर टाकतेय.

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न...
प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही. नोकरीपासून धंद्यापर्यंत हे स्थलांतर आजही होतेय. पुणे, मुंबईतून अल्पसा वर्ग प्रामुख्याने नोकरीच्याच मिषाने इथे आला आहे. ज्याचे वास्तव्य साधारपणे अल्पकालीनच म्हणजे नोकरीपुरतेच असते. पण याशिवाय नागपूर आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात. यात उच्चशिक्षित नोकरीसाठी येतात, तर इतर म्हणजे समाजातल्या खालच्या स्तरातले लोक छोट्या-मोठ्या नोकर्या आणि व्यवसायासाठी इथे येतात. याची कारणे अनेक आहेत. विदर्भातील लोक प्रामुख्याने इंदूर, भोपाळ, जबलपूर आणि छत्तीसगडमधल्या विलासपूर, रायपूर या भागात वरील सर्व कारणांसाठी स्थलांतरीत होतात. म्हणजे मूळ स्थलांतरीत आणि नव स्थलांतरीत असा मोठा वर्ग मध्य प्रदेशातील या शहरांत रहातो आहे. याशिवाय फार वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेली अनेक मराठी मंडळी मध्य प्रदेशातील अनेक गावागावांत रहात आहेत, ती वेगळी.
ही सगळी मंडळी (प्रामुख्याने फार पूर्वी स्थलांतरीत झालेली) इतकी वर्षे राहूनही मराठी राहिली आहेत का? तर मुळात मराठी रहाणे म्हणजे काय हे आधी तपासावे लागेल? भाषा या दृष्टिकोनातून विचार केल्यास महाराष्ट्रात बोलली जाते तशी मराठी इथे नक्कीच बोलली जात नाही. त्यातल्या त्यात एकुणात मध्य प्रदेशात इंदूरमध्ये बरीच बरी मराठी बोलली जाते. बरीच बरी हा शब्द गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही दृष्टीने लागू आहे. पण इंदूरी मराठी म्हणजे हिंदीची पोटबहिण मानायला हरकत नाही, इतकी त्यात सायुज्यता आहे. इंदूरी मराठीचे अनेक नमुने मी यापूर्वीच्या माझ्या लेखात आणि इतरांनी दिलेल्या दुव्यातही सापडतील. पण अनेक कुटुंबात पुढची पिढी प्रामुख्याने हिंदीत बोलते. याचे कारण आदल्या पिढीत किमान (इंदूरचा विचार केला तर) मराठी शाळा होत्या. त्यामुळे त्यांचे काही शिक्षण मराठीत किंवा मराठी विषय घेऊन झाले. तसे या पिढीत झालेले नाही. घराच्या बाहेर पडल्यानंतर मराठीचा कुठेही संबंध येत नाही. मैत्रिणी मराठी असल्या तरी एकुणात ग्रुप हिंदी असल्याने दोन मराठी मैत्रिणी हिंदीतच बोलतात. त्यांना हिंदीत बोलणेच जास्त कम्फर्टेबल वाटते. अनेकांना मराठी कळते, पण बोलता येत नाही. काहींचे आई-बाबा मराठीत, मुले हिंदीत आणि परस्परांशी बोलताना हिंदीतच बोलतात.
हे सगळं असलं तरीही ही मंडळी 'मराठीच' राहिली आहेत, भलेही ती हिंदी बोलत असली तरी. कशी? पहा. भाषा हा निकष लावला तर नक्कीच त्यांना 'मराठी येत नाही', 'तितके चांगले येत नाही' किंवा 'समजते पण बोलता येत नाही' अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. पण मराठी माणसांची गुणवैशिष्ट्ये मात्र त्यांनी उचलली आहेत. इथला मराठी माणूस व्यवसायात फारसा कुठेही दिसत नाही. इथला संपूर्ण व्यवसाय गुजराती आणि मारवाडी आणि उरलेला हिंदी भाषकांच्याच ताब्यात आहे. मराठी माणूस इथेही नोकरदारच आहे. शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने मराठी मंडळी नावाजलेली आहेत. बाकी इतर नोकर्यातही मराठी माणूस मोठ्या 'टक्क्याने' दिसून येतो. पत्रकारीतेतही मराठी नावे दिसून येतात. नई दुनिया या प्रमुख दैनिकाचे संपादक जयदीप कर्णिक हे तर चक्क मराठी आहेत. मुळात या दैनिकाचे एक गाजलेले संपादक कै. राहूल बारपुते (पुलंचे मित्र) मराठीच होते. याशिवायही अनेक मराठी भाषक हिंदी पत्रकारांची देदिप्यमान परंपरा इथे आहे.
मराठी माणसाची सांस्कृतिक आवड नि गरज इथेही तुटलेली नाही. इंदूरमध्ये तरी भरपूर मराठमोळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यासाठी महाराष्ट्रातून कलावंत तर येतातच, शिवाय इथेही मोठ्या प्रमाणात नाटके, गाण्याचे कार्यक्रम होतात. आधीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी नियमितपणे होतात ही महत्त्वाची बाब आहे. त्याला उपस्थित रहाणारी मंडळी चाळीशीच्या पलीकडे असतात. पण काही चुकार तरूणही दिसून येतात. सानंदसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठीपण हरवू नये यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यात नाट्य व एकांकिका स्पर्धेचा उपक्रम आहे. यात मोठ्या प्रमाणात मराठी तरूण जोडला गेला आहे. हा तरूण एरवी हिंदी बोलतो आणि कार्यक्रम मराठीत सादर करतो. (आश्चर्य वाटेल, पण डिश टिव्ही आल्याचा मोठा फायदा इथल्या मंडळींना झाला कारण समकालीन मराठी काय आहे ते त्यांना कळले. हल्ली इथल्या सर्व मराठी घरांत किमान सायंकाळी तरी मराठीच कार्यक्रम लागलेले असतात.)
पुरोहित परंपरा इथेही जपली गेली आहे. सगळे मराठी सण, समारंभ नियमित व्रतवैकल्ये इथला मराठी माणूस करतो. किंबहूना जास्त निष्ठेने करतो. माझी बायको या सगळ्या व्रतवैकल्यात फारशी सहभागी होत नाही, हे पाहून आमच्या घरमालकिणबाईंना आश्चर्य वाटते. बारशापासून बाराव्यापर्यंत कुठलेही विधी हिंदी पद्धतीने होत नाहीत. हिंदी भाषकांचा सांस्कृतिक व धार्मिक त्यांनी आपल्यावर पडू दिला नाही. म्हणूनच करवा चौथ मराठी भाषक महिला करत नाहीत. हिंदी भाषकांचा श्रावण आपल्याआधी पंधरा दिवस सुरू होतो. पण इथले मराठी भाषक श्रावण आपल्या पद्धतीनेच साजरा करतात. (उज्जैनला श्रावण सोमवारी महाकालाची स्वारी निघते.खास मराठी भाषकांसाठी ती इथल्या श्रावणाच्या पाचव्या आणि मराठी भाषकांच्या पहिल्या श्रावण सोमवारीही काढली जाते.) गणपतीला आलेले महाराष्ट्रातील उत्सवी रूप तसेच इथे दिसत नसेल, पण इतर शहरांपेक्षा इथला उत्सव डोळ्यात भरेल असाच असतो. स्वयंपाकात या भागातल्या पदार्थांनी शिरकाव केला असला तरी मुळचे मराठी पदार्थ सुटलेले नाहीत. इथल्या सर्व सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सर्व जातीसमूहात वाटला गेलेला मराठी माणूस सहभागी असतो. धनगर, मराठा समाजही इथे मोठ्या प्रमाणावर आहे ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
या झाल्या सार्वजनिक गोष्टी. वैयक्तिक किंवा खासगी बाबीतही हे मराठीपण तुटलेले नाही. हिंदी भाषक प्रांतात असल्याने आंतरजातीय विवाह हिंदी भाषकांशी होतात, पण हे प्रमाण तसे कमी आहे. प्रामुख्याने आपल्या भाषक जातीगटात विवाह करण्याकडेच इथल्याही बहुतांश पालकांचा कल असतो. त्यातही गंमत आहे. मुलगा किंवा मुलगी शक्यतो मध्य प्रदेशातीलच असावी यासाठी पालक बर्याचदा आग्रही असतात. कारण एकच, वातावरणाची सवय. मध्य प्रदेशातील एक विशिष्ट रहाणीमानाची सवय झालेली असते. महाराष्ट्रात मुलगी दिल्यास सगळेच वेगळे असाही विचार असतो. आता मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी महाराष्ट्रात गेल्यास या अटी गळून पडतात.
मराठी माणसांची याही पलीकडे असलेली गुणवैशिष्ट्ये इथल्या मराठी मंडळींनी जपलीत. 'चळवळेपण' सुटलेले नाही. स्वातंत्र्यसंग्रामापासून ते अगदी आताच्या सहकारी चळवळीपर्यंत आणि राजकारणातही मराठी माणसू एक्टिव दिसून येतो. मराठी माणसाच्या या सगळ्या सांस्कृतिक, सहकारातील, राजकारणातील आणि इतर चळवळीतील योगदानामुळे इंदूरमधल्या अनेक चौकांना, वास्तुंना मराठी माणसांची नावे आहेत. (होळकर विश्वविद्यालय, सरवटे बस स्टॅंड, देवळालीकर कलाविथिका, होळकर रूग्णालय, बापट तिराहा, वाकणकर पुरस्कार इ.अशी अनेक नावे सांगता येतील.) समाजिक कामात इथेही मराठी माणूस आघाडीवर आहे. मध्यंतरी देहदानासंदर्भात एक बातमी होती. त्यात देहदानाचे प्रमाण कमी अशी खंत व्यक्त केली होती. त्यात देहदान करणार्या दहा व्यक्तींची नावे होती. त्यात सहा मराठी होती. बाकीची जैन! इथल्या वृत्तपत्रात सामाजिक सुधारणेसंदर्भातील पत्रे छापून येतात, त्यातली अधिकांश मराठी माणसांनी लिहिलेली असतात. इथे मराठी वाचनालयेही बरीच आहेत, त्यांना सदस्यही बर्यापैकी आहेत. नवीन पुस्तकेही बरीच येतात. इतकेच नव्हे तर येथील लेखकांची मराठी पुस्तके प्रकाशितही होतात. अगदी तीन दिवाळी अंकही निघतात.
मराठी भाषकांच्या मोठ्या गटामुळे त्यांच्याविषयीच्या बातम्या इथे विपुल शब्दांत छापून येतात. त्यांचे सण-समारंभ, कार्यक्रम यांचे वृत्तांतही येतात. त्यांची दखल पेपरवाल्यांना घ्यायलाच लागते. अनेक पेपरवाल्यांनी आतले एक पान मराठीत द्यायला सुरवात केलीये. एवढंच काय आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून उभ्या असलेल्या एका उमेदवाराने या भागातली तेवढी पत्रके मराठीत छापली होती.
भाषा सुटली म्हणून इथल्या मंडळींनी संस्कृती सोडली नाही. उलट ती घट्ट धरून ठेवली. याची कारणे काय याचा मी अनेकदा विचार करतो. भाषा सुटल्याने सामाजिक अस्तित्व संपणार नाही, पण संस्कृती तुटली तर तेच गमावून बसू आणि इथल्या हिंदी भाषकांत इतके मिसळून जाऊ की आपण कोण याची ओळख आपल्यालाच पटू नये, ही जाणीव कदाचित इथल्या मराठी मंडळींमध्ये खोलवर रूजली असावी.भाषा टिकवणे, जपणे खरं तर ही वैयक्तिक आणि नंतर सामूहिक बाब आहे. त्यासाठी आपण किती आग्रही रहातो हे जास्त महत्त्वाचे आहे.
(ता. क. माझ्या इंदूरमधल्या एका परिचितांनी सांगितलं, इथे पूर्वी राजवाड्याच्या भागात किराणा मालाची बरीच दुकानं होती. अर्थातच गुजरात्यांची. त्यांच्याकडे मराठीत यादी घेऊन गेलो तरी ते सामान काढून द्यायचे. इतकच नाही, तर यादीतली एखादी वस्तू क्रमाने नसली तरी सांगायचे.' एवढंच काय माझ्या कॉलनीसमोरची दुकानंही सिंधी आणि गुजराती माणसाची आहे. तिथे कोकणातल्या कोकम सरबतापासून, चितळेंच्या मिठाईपर्यंत सारं काही मिळतं. यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो. जुजबी मराठी बोलायलाही ते शिकलेत. त्याला ही गिर्हाईकं टिकवून ठेवण्याची नि वाढविण्याची गरज असल्याने तो ही भाषा शिकला!)

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता. स्वतः लेखकही होता. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली. या पुस्तकांचे विषयही अगदी शिल्पशास्त्रापासून ते साहित्यापर्यंत आहेत. भोजाविषयी उत्सुकता खूप दाटली होती. आणि एक दिवस अचानक धारला कूच केले.
धार हे पवारांचे संस्थान. पण ते अगदी अलीकडचे. त्याही आधी ते परमार वंशाच्या राजा भोजची राजधानी होते. या धार नगरीतच एकीकडे जसा दुसर्या बाजीरावाचा जन्म झालेला किल्ला भग्नावस्थेत इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा आहे. त्याचवेळी गावाच्या दुसर्या भागात हिंदू-मुसलमानांमधील रक्तरंजीत संघर्षाचे डाग घेऊन 'भोजशाळा' उभी आहे. भोजशाळा. दोन वर्षांपूर्वी या भोजशाळेवरून हिंदू- मुसलमानांमध्ये झालेला संघर्ष माहिती होताच. त्यामुळे धारमध्ये आल्यानंतर या शाळेला भेट देणे क्रमप्राप्तच होते. गावाच्या एका कडेला भाजीबाजाराच्या पाठिशी ही भोजशाळा आहे.
शाळेला लागूनच मशीद आहे. शिवाय कब्रस्तानही. शाळेच्या आवारात कुंपण घातले आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था अगदी कडक. सगळी तपासणी करून आत सोडतात. आत गेल्यानंतर तर चक्रावलोच. मंदिराच्या भिंतीला अगदी खेटून मशीद. प्रत्यक्ष भोजशाळेत प्रवेश करतानाही कडक तपासणी झाली. आत गेलो. चार बाजूंनी मंडप असलेली मधले आवार मोकळे असलेली इमारत म्हणजे भोजशाळा. जवळपास हजारेक वर्ष जुनी. पुरातत्व खात्याने या शाळेतील खांब पूर्वीसारखे वाटतील असे उभे केलेले आहेत. भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही. उलट तिथल्या वास्तुशिल्पाला छेद देईल असे न शोभणार्या काळ्या संगमरवरी दगडात आयते मात्र कोरलेली आहेत.
या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. विद्यादानासाठी राजा भोजने बांधलेली वास्तु आता धार्मिक वादात अडकली आहे. विद्येचा वारसा जपण्याऐवजी वाद रंगला आहे, याने मन व्यथित झाले.
------------------------
राजा भोजाविषयीच्या माहितीत भोजपूरचा उल्लेख आला होता. हे भोजपूर म्हणजे भोपाळपासून जवळपास १८ किलोमीटरवर आहे. इथे म्हणे त्याने मोठे शिवमंदिर उभारण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय एक मोठा तलाव बांधायला घेतला होता. या तलावाची रचना अशी केली होती की नैसर्गिक पद्धतीने पाणी फिरून येईल. हे मंदिर बघण्याची आस होती. सांची पाहून आल्यानंतर भोपाळमध्ये मुक्काम केलाच होता. दुसर्या दिवशी भोजपूरला निघालो. 'मध्य प्रदेश सडक परिवहन निगम'च्या अनुबंधित ट्रेवल्स बसने प्रवास करण्याचे 'दिव्य' पार पाडत अखेर आम्ही भोजपूरला पोहोचलो. एका टेकडीवर हे मंदिर आहे. मूळ मंदिर तर पार पडून गेले आहे. पण पुरातत्व खात्याने मूळ वाटावे असे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. 'भिंत खचली कलथून खांब गेला'चा अनुभव पहाताना आला. मंदिर पुष्कळच भव्य आहे. त्याचे तुकडे जोडून ते रचण्याचा प्रयत्नही दिसून येतो. वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वांत उंच शिवलिंग या मंदिरात आहे. हे शिवलिंगही तुटले होते. पुरातत्व खात्याने जोडून ते उभारले आहे. मंदिरासमोर छुटपूट मंदिरे आहेत. त्याचे मस्तपैकी व्यावसायिकरण झाले आहे. मुख्य मंदिरात मात्र पुरातत्व खात्याने कोणतीही पूजा करायला बंदी घातलीय ही समाधानाची बाब. आजूबाजूला छान हिरवळ आहे.
त्याकाळी राजा भोजने बांधलेल्या तलावाचा अंदाज येतो. राजा भोज आजारी असताना येथे आला होता. विशिष्ट प्रकारे पडणार्या पाण्याने अंघोळ करावी असा सल्ला त्याला वैद्याने दिला होता. म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारा तलाव बांधला गेला होता. या तलावाचे बांधीव काठ आजही दिसून येतात. भोजपूरला येण्याआधीच त्याच्या संरक्षक भिंती दिसतात. त्यावरून तो किती मोठा असावा याचा अंदाज येतो. पण आता तलाव म्हणून काहीही शिल्लक नाही. इथेही मुस्लिम आक्रमकांनी मोठी भूमिका बजावली. होशंगाबादने हा तलाव मध्ययुगात फोडून टाकला होता. त्यामुळे त्यात पाणी साठणे बंद झाले. आता तर भौगोलिकच बदल भरपूर घडले आहेत.
हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. इंदूरचे संग्रहालय मध्यंतरी पहायला गेलो. त्यावेळी हजार, दोन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्ती सरळ इमारतीच्या बाहेर ठेवलेल्या दिसल्या. पावसात त्या भिजत होत्या. तीच स्थिती धारच्या किल्ल्यातील किमती सामानाची आणि मांडूतल्या मौल्यवान शिल्पांची. लोकांची बेपवाई तर बोलायला नको. इंदूरमध्ये रहाणार्या अनेकांना भोजपूर माहित नाही. आम्ही भोजपूरला जातो, गेलो हे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तिच्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्हांसहित विविध भाव पाहूनही त्रास व्हायचा. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. एकुणात काय हे सगळं पाहिल्यानंतर उगाचच उदास होऊन परतलो.

खवय्यांचं इंदूर
लोक जगण्यासाठी खातात, पण इंदूरचे लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदुरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि या किश्श्यांत कणभरही अतिशयोक्ती नाही हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेशी बांधील नाही. त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं (किमान इंदूरमध्ये आल्यानंतर तरी) कारण नाही.
महाराष्ट्रात सकाळी नाष्टा करण्यासाठी हॉटेलमध्ये विविध पदार्थ असतात. काही ठिकाणी मिसळ खूप प्रसिद्ध आहे. इंदुरी लोकांचा दिवस सुरू होतो (आणि संपतोही) तो पोहे आणि जिलबीने. जिथे जाल तिथे पोहे दिसतात. केव्हाही गेलात तरी गरम पोहे मिळतात. या पोह्यांवर विविध प्रकारची शेव, मसाला घालून दिले जातात. काही ठिकाणी जिलबीही मिळते. सकाळी नाष्टा म्हणजे पोहे हे इथे समीकरण आहे. म्हणूनच प्रचंड प्रमाणात पोहे खपणारे हे भारतातील एकमेव शहर असावे. या माझ्या विधानातही कणभरही अतिशयोक्ती नाही.
इंदूरमध्ये आलात आणि बडा सराफ्याला गेला नाहीत तर तुम्ही इंदूर देख्याच नहीं, असे म्हणता येईल. कारण सराफा हा इंदुरच्या खाद्यसंस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. इथे जिवंत या शब्दाला फार अर्थ आहे. इंदूरमध्ये मधोमध होळकरांचा राजवाडा आहे. या राजवाड्याच्या मागच्या भागात अतिशय दाटीवाटीने दुकाने आहेत. यात कपडे, सराफांची दुकाने अर्थातच जास्त आहेत. पुढे गेल्यास सर्व सराफ बाजार लागतो. या बाजारालाच सराफा म्हणतात. पण हा सराफा सोन्यापेक्षाही तेथील खाद्यसंस्कृतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहे. येथे सराफी दुकाने बंद झाली की रात्री साडेनऊनंतर विविध खाद्यपदार्थांची दुकाने लागण्यास प्रारंभ होतो. ही दुकाने रात्रभर उघडी असतात. त्यामुळे हा भाग रात्रभर अगदी जिवंत असतो. चहल पहल रात्रभर सुरू असते. आणि ही काही यात्रेतल्यासारखी एका रात्रीची दुकाने नसतात. वर्षातील ३६५ दिवस हे चित्र असंच असतं. सराफा कधीही झोपत नाही.
इथल्या विजय चाटभंडारचे खोब्रा पॅटीस, बटला (वाटाणे) पॅटीस याशिवाय इतर पॅटीसचे प्रकार म्हणजे अप्रतिम. याच दुकानाच्या समोर असलेल्या जॉनी हॉटडॉगची (हिंदीत हाटडाग) छोले टिकिया, हॉटडॉग प्रसिद्ध आहेत. सराफ्याच्या आत घुसल्यास जोशी का दहीवडा हे दुकान लागेल. माझ्यासारख्या खाण्यावर नितांत प्रेम करणाऱ्यानेही याच्याइतका अप्रतिम दहीवडा आजपर्यंत खाल्लेला नाही. निव्वळ अप्रतिम एवढ्या शब्दातच त्याच्या चवीचे वर्णन करता येईल. या वडेवाल्याचीही वडा देण्याची विशिष्ट पद्धत आहे. पत्रावळीच्या वाटीत तो वडा काढतो. त्यावर भरपूर दही घालतो आणि नंतर त्यावर विविध मसाले घालतो. पण हे विविध प्रकारचे मसाले त्याच्या एकाच हाताच्या विविध बोटात असतात. आणि तो बरोब्बर त्यातील एकेक एकावेळी घालतो. हे प्रमाण कधीही कमी जास्त आजवर झालेलं नाही. शिवाय हे सर्व मसाले घालत असताना पत्रावळीची वाटी तो उंच फेकून पुन्हा झेलत असतो. हे करताना आजवर ही वाटी कधीही पडलेली नाही. या सराफ्यात फिरताना मक्याचा कीसही मिळतो. त्याची चवही फारच छान लागते. याशिवाय कचोरी, सामोसे हे येथील पदार्थही प्रसिद्ध आहे.
पाणीपुरीवर बंदी घातल्यास इंदुरी लोक तडफडून मरतील असे माझ्या ऐकण्यात आले आहे. आपल्याकडे वडा पाव जसा यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तेच येथे पाणीपुरीचे आहे. अगदी पाच रुपयाला दहा पुऱ्यांपासून पाच रुपयाला पाच पुऱ्यांपर्यंत त्याची रेंज असते. या पाणीपुरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती शक्यतो तिखट पाण्याबरोबरच खातात. चिंचेचे आंबटगोड पाणी सहसा त्यात घातले जात नाही. ही पाणीपुरी खाल्ल्याशिवाय इंदूर सोडणे महापाप. मला स्वतःला पूर्वी पाणीपुरी फारशी आवडत नव्हती. (कारण पाणीपुरीने पोट भरू शकते यावरच विश्वास नव्हता.) पण येथे आल्यानंतर पाणीपुरी भयानक आवडायला लागली आहे. येथील दहीपुरीही क्लास. इंदुरच्या महात्मा गांधी रस्त्यावर सिख मोहल्ला नावाचा भाग आहे, तेथेही ही सगळी चाटची दुकाने आहेत.
याशिवाय पलासिया नावाच्या भागालगत छप्पन दुकान नावाचा भाग आहे. गेल्या वीस वर्षांपासून या भागात विविध खाण्यापिण्याची दुकाने सुरू झाली. हा भाग आता खाद्यपदार्थांचे आणखी एक केंद्र बनला आहे. राजवाडा भागात मिळणारे पदार्थ तर येथे मिळतातच, पण याशिवाय इतरही पदार्थ येथे मिळतात. राजवाडा भागात असलेल्या दुकानांनी येथेही शाखा उघडल्या आहेत. पण येथे मिळणाऱ्या जॉनीचा बेंजो हा पदार्थही आवर्जून चाखायला हवा. गोलाकार पावाच्या आत आमलेट असे त्याचे स्वरूप असते. पण चवीला ते खूपच छान लागते. संध्याकाळी येथे तरुणाईचा वेढा या भागाला पडलेला असतो. गाड्यांमधून तरुणाई इकडे तिकडे सांडत असते.
कोठारी मार्केट भागात सपना सॅंडविच नावाचे एक दुकान आहे. सॅंडविचचे एवढे प्रकार असू शकतात, हे येथे आल्यानंतर मला कळले. एकेक चव जिभेवर रेंगाळणारी. अगदी बारा रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंतची सॅंडविचेस त्याच्याकडे आहेत.गोड खाणं हा इंदुरी लोकांचा वीक पॉईंट म्हणता येईल. यांच्या जेवणात काही गोड नसेल तर जेवण खरोखरच गोड लागणार नाही. माझे एक खास इंदुरी नातेवाईक सुरवातीच्या काळात कधीही फोन केला की विचारायचे आज गोड काय? आमच्याकडे गोड सणावाराला किंवा काही विशिष्ट दिवशीच करतात, हे त्यांना मला हे समजावून सांगायला खूप अवघड गेलं. नानाविध गोड पदार्थ इंदुरी लोकांची रसना भागवायला हजर असतात. रबडी, माव्याचा कीस, गुलाबजाम, रसगुल्ले, शिकंजी असे गोड पदार्थही येथे ठायी ठायी मिळतात. इंदूरचा शिकंजी हा पदार्थही प्रसिद्ध आहे. दुधासह, आंब्याचा रस, पपईचा लगदा आणि असे बरेच काही घालून हे पेय तयार केले जाते. एकदा शिकंजी खाल्ल्यानंतर आपण दुसरे काहीही खाऊच शकत नाही, एवढी ती पचायला कठीण असते. हिवाळ्याच्या दिवसात सध्या गजक हा पदार्थ दिसतोय. हे गजक म्हणजे संक्रांतीला आपल्याकडे केल्या जाणाऱ्या तिळाच्या वड्यांसारखं असतं. पण चवीला छान लागते.
मोनिकाचं आइसक्रीम आणि नेमाची कुल्फी हे दोन पदार्थ खाल्ले नाही तर तुम्ही इंदूरला आले नसतात तरी चाललं असतं, असं म्हटलं जातं. हायकोर्टासमोरच्या मोनिका आइसक्रीम या दुकानात आइसक्रीमचे जेवढे प्रकार मी पाहिले तेवढे आजपर्यंत कुठेही पाहिलेले नाहीत.दोन मोठ्या फ्रीजमध्ये हे प्रकार मांडून ठेवले आहेत. हे प्रकार पाहिल्यानंतर यातलं कुठलं घ्यावं असा प्रश्न पडतो. चवी अगदी जिभेवर रेंगाळणाऱ्या. तीच कथा नेमाच्या कुल्फीची. ही कुल्फी आयुष्यात एकदा तरी खाल्लीच पाहिजे.
इंदूरला आल्यानंतर जेवायचं कुठे हा प्रश्न पडायचं कारण नाही. कारण इथल्या गुरुकृपा हॉटेलची प्रसिद्धी अगदी दिगंत झाली आहे. या हॉटेलमध्ये संध्याकाळी किमान शंभर दीडशेचे वेटिंग असते. ( संध्याकाळी खूप प्रतीक्षा करावी लागते, म्हणून लोक येथे पाच, सहाला सुद्धा जेवायला म्हणून येतात.) या हॉटेलमध्ये शिरेपर्यंत ते काय चीज आहे ते कळत नाही. आतमध्ये अप्रतिम सजावट. शिवाय तिन्ही मजल्यांवर वेगवेगळी. मुख्य म्हणजे येथील पदार्थ. येथे किती ओरपशील दो कराने एवढाच प्रश्न असतो. त्यातही ही मंडळी आतिथ्यशील. अगदी अगत्याने वाढणार. वाढण्यात कुठलीही कंजूषी नाही. हे आतिथ्य तुम्ही पैसे देता म्हणून नाही. अगदी आतून येतं. आणि बिल पाहिल्यावर एवढं खाल्लं तरी बिल एवढंच हा प्रश्नही तुमच्या समाधानी चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहणार नाही.
अशी ही इंदूरची खाद्यसंस्कृती. नानाविध चवींची आणि चवीनं खाणाऱ्यांची.

इये इंदुर नगरी
अस्मादिकांचे वास्तव्य सध्या इंदूर शहरात आहे. काही गावांची नाव उच्चारली तरी अंगावर रोमांच उमटतात. ग्वाल्हेर, इंदूर, अटक, पानिपत ही गावं त्यापैकीच. कारण या गावांना इतिहासाचा स्पर्श आहे. उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यांच्या फौजांनी नर्मदापार झेप घेताना अनेक ठिकाणी आपल्या पराक्रमाचे झेंडे गाडले. या मोहिमांमधील ही काही गावं. इंदूर हे त्यातले मध्य भारतातील महत्त्वाचे ठिकाण. मल्हारराव होळकरांच्या कर्तृत्वाचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाच्या काळात या या भागाची वाटणी झाली आणि ग्वाल्हेर शिंद्याच्या वाट्याला, इंदूर होळकरांकडे आणि धार पवारांकडे गेले. पण प्रामुख्याने अमराठी प्रांतातील प्रमुख मराठी गावे सांगताना ग्वाल्हेर व इंदूर ही नावं प्रामुख्याने येतात.
(थोडं विषयांतर, सुरवातीला उज्जैन शिंद्यांकडे होतं. पण तेथे महाकालेश्वर (ज्योतिर्लिंग) हा एकच राजा असतो, अशी समजूत आहे. तो इतरांना तेथे राहू देत नाही, असे मानतात. म्हणून शिंद्यांचा राजवाडाही गावाबाहेरच बांधण्यात आला. त्यानंतर त्यांनी तेथून सर्व काही हलवून ग्वाल्हेरला कूच केलं. धार व देवास ही पवारांच्या धाकटी पाती व थोरली पाती यांच्या वाटणीत वेगळी झालेली संस्थानं आहेत.)
त्यापैकी इंदुरात मी रहातो. मराठ्यांच्या विशेषतः पेशवाईच्या काळात उत्तर दिग्विजयासाठी मराठी फौजांनी स्वाऱ्या केल्या. त्यानंतर मराठी सत्ता येथे प्रस्थापित झाल्यानंतर अनेक मराठी कुटुंबे येथे स्थिरावली. त्यानंतरही येत राहिली. अगदी विसाव्या शतकातही रेल्वे खाते वा केंद्र सरकारच्या नोकरीच्या निमित्ताने अनेक कुटुंबे महाराष्ट्रातून येथे आली. स्थिरावली. त्यामुळे मध्यप्रदेशात ठिकठिकाणी मराठी कुटुंबे सापडतात. अनेक ठिकाणी त्यांच्या वेगळ्या गल्ल्या आहेत. इंदूर, ग्वाल्हेर व्यतिरिक्त धार, देवास, महेश्वर, जबलपूर, झाबुआ अशा अनेक ठिकाणी मराठी लोक आहेत. मध्य प्रदेशातील प्रत्येक शहरात मराठी माणसे आहेतच. विशेष म्हणजे ती अनेक वर्षांपासून तेथे रहात आहेत.
आता इंदूरबद्दल. हे शहर मध्य प्रदेशातील सर्वांत मोठे शहर आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ असली तरी सर्व महत्त्व मात्र इंदूरला आहे. (येथे मराठीत लिहिताना इंदूर लिहितात. हिंदीत उल्लेख असल्यास इंदौर असे लिहितात.) या शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या आसपास आहे. इंदूर ज्या भागात आहे, त्याला माळवा प्रांत असे म्हणतात. मध्य प्रदेशातील सर्वांत संपन्न, समृद्ध प्रांत म्हणजे माळवा. त्याची राजधानी इंदूर. त्यामुळे तीही तितकीच संपन्न आहे. इथे लोकांकडे पैसा भरपूर आहे. (इथे असलेली दागिने, कपड्यांची दुकाने आणि खाण्यापिण्याचे नानाविध पदार्थ यातूनही ही समृद्धी जाणवते.) कारखानदारी काही प्रमाणात असली तरी शेतीआधारीत उत्पन्नही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात चमक धमक आहे.
इंदूरमध्ये मराठी लोकांचे प्रमाण वीस टक्क्यांच्या आसपास जाईल. पूर्वी हे प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त होते, असे म्हणतात. पण इंदूरच्या समृद्धीमुळे बाहेरून येथे खूप लोक आले. त्यामुळे येथेही मराठी टक्का कमी झाला. येथील रामबाग हा येथील जुना मराठी इलाका. होळकरांचा जुना राजवाडा गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. तेथे लागूनच रामबाग आहे. या भागात वाडे बरेच होते. आता वाडे पाडून इमारती बांधल्या जाऊ लागल्या आणि मुंबईतील मराठी माणूस जसा उपनगरात गेला अगदी तशीच स्थिती येथील मराठी मंडळींचीही झाली. त्यामुळे आता नारायण बाग या भागात काही मराठी मंडळी रहातात. बाकी लोकमान्य नगर, राजेंद्र नगर, सहदेव नगर, टिळकनगर या भागांमध्ये मराठी मंडळी रहायला गेली आहेत. या भागात गेल्यास कानावर मराठी पडू लागते.
मराठी मंडळी कुठेही गेली तरी त्यांचे काही गुण अगदी सारखे आहेत. त्यामुळे येथील मराठी मंडळीही प्रामुख्याने नोकरी क्षेत्रात आहेत. येथील कुठल्याही शाळेत गेल्यास किमान चाळीस ते पन्नास टक्के शिक्षक वर्ग मराठी आहे. कॉलेजांमध्येही तीच परिस्थिती. डॉक्टर मंडळीतही मराठी लोकांचे प्रमाण बरेच आहे. याशिवाय इतर खासगी सेवा क्षेत्रातही मराठी लोक बरेच आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर मराठी ऐकू येणे ही नवलाची बाब रहात नाही. (इतर हिंदी भाषक क्षेत्रात असे वाटू शकते.) त्यातच मराठी माणसांचे आणखी एक क्वालिफिकेशन म्हणजे प्रामाणिकपणा. त्यामुळे नोकरी देणाऱ्यापुढे मराठी, पंजाबी, राजस्थानी, बिहारी वा इतर कुठलाही हिंदी भाषक आल्यास तो प्राधान्य मराठी माणसालाच देतो. कारण तो प्रामाणिक असतो. आपलं काम भले आणि आपण भले असा त्याचा एटिट्यूड असतो. आणि आपल्याकडून शिकून दुसरीकडे जाऊन स्वतःचा उद्योग सुरू करेल अशी सुतराम शक्यता नसते. थोडक्यात येथील मराठी माणूस हा अपवाद वगळता नोकरदारच आहे.

होळी रे होळी!
होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके उडविण्यातली मजा गावात तेव्हा खरोखरच नव्हती.
होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची. होळीच्या आजूबाजूला सगळी मच्छी विक्रेत्यांची दुकानं होती. मच्छी बोंबिल यांचा वास घेत घेतच होळीच्या जागेची सफाई सुरू होत असे. आणि त्यानंतर होळी खोदली जायची.
त्याचवेळी आम्हा मुलांपैकी एक गट होळीसाठी लाकडं आणि गवर्या गोळा करायला आजूबाजूच्या घरांमध्ये जात असे. या गटात माझा मावेश असे. (कारण खोदकाम वगैरे टाळणे हा उद्देश) आमच्या आगमनाची वर्दी हातातली डबडी देत असत. कुणाच्याही घरी गेल्यानंतर दडा दडा डबडी वाजवत सामुदायिकरित्या एक परवलीचं वाक्य म्हटलं जायचं. 'पाच लाकडं पाच गवर्या दिल्याच पाहिजेत.' खणखणीत आवाजात मागणी मांडल्यानंतर घरातील बाई बाहेर येऊन आम्हाला लाकडं आणि गवर्या जे काही उपलब्ध असेल ते देत असे. गावात बहुतांश घरांत किमानपक्षी पाणी तापवायला तरी चुलीचाच वापर होत असल्याने लाकडं आणि गवर्या जवळपास सगळ्यांच्याच घरी सायच्या. ज्या घरात लाकडं नसत. ती मंडळी गावात लाकडाचे भारे घेऊन येणार्या आदिवासी मंडळींकडून भारे घेऊन होळीला देत असत. होळीच्या आजूबाजूला बसणारे 'मांगेले' (मच्छी विकणारे) प्रत्येकी एकेक भारा द्यायचे.
ही सगळी लाकडे आणि गवर्या घेऊन आम्ही मंडळी होळीच्या तिथे यायचो. तोपर्यंत खणण्याचं काम पूर्ण झालेलं असायचं. मधल्या काळात मोठी मंडळी काम कुठवर चाललंय ते बघायसाठी येऊन जायची. मग संध्याकाळी हातातली काठी टेकत टेकत अप्पाकाका यायचे. हे आमच्या गल्लीत रहाणारे पुरोहित. 'संसार केला घाई घाई म्हातारपणाला काही नाही' हे पालुपद त्यांच्या तोंडी असायचं. हे अप्पाकाका मग मोठ्यांच्या मदतीने होळी रचायचे. होळी रचण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे. आधी होळीच्या खड्ड्यात मध्ये मोठठं लाकूड ठेवायचं. मग त्याला आधाराला खाली जड छोटी लाकडं रचायची आणि त्याच्या बाजूला गवर्या रचायच्या. त्यामुळे मधलं लाकूड हलायचं नाही. मग हळूहळू इतर लाकडं रचत जायची. असं करत करत होळी रचण्याचे काम पूर्ण व्हायचे.
मग आजूबाजूच्या बायका येऊन होळीभोवती रांगोळी काढायच्या. छानपैकी होळीची तयारी पूर्ण व्हायची. त्यानंतर अप्पाकाका होळीची पूजा करायचे. आम्ही सगळे त्यांना हवं नको ते बघत असू. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम असायचा. अप्पाकाका एका जळत्या लाकडाच्या सहाय्याने होळी पेटवायचे. मग आम्ही बच्चेमंडळी होळी सगळ्या बाजूंनी पेटवायचो. मग धडधडणार्या ज्वालांशी स्पर्धा करत आम्ही जोरदार 'बोंब' ठोकायचो.
होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय.
होळी एकदा पेटली. सगळयांची जेवणं झाली, की आजूबाजूच्या घरची सगळी मंडळी होळीच्या आसपास येऊन बसायची. मग एक छानपैकी गप्पांची मैफल रंगायची. याची त्याची गंमत, टर उडविणे. किस्से सांगणे यात मजा यायची. मूळची गावातली पण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीही या निमित्ताने गावात यायची. तीही मग होळीवर यायची. यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यामुळे गप्पांना बहर यायचा.
एकीकडे हे चालू असताना होळी रात्रभर पेटती ठेवण्यासाठी लाकडे चोरून आणली जायची. यात आम्हा मुलांना फारच रस. शिवाय त्यात मोठी माणसंही आम्हाला 'मौलिक' मदत करायची. कुणाच्या घराच्या आजूबाजूला ठेवलेली लाकडं घरमालकाच्या नकळत पळवून आणणे हे मोठे शौर्याचे मानले जायचे. कुणाच्या कुंपणातली लाकडं पळव, तर कुणाचं फाटकच पळवून होळीत टाक. असले उद्योग फार चालायचे. यातून काही भांडणही व्हायची. पण ती बाब अलहिदा. लाकडं पळवून नेऊ नये म्हणून अनेक घरातील लोक रात्रभर जागत असत.
याशिवाय होळीची आणखी एक मजा म्हणजे लोकांची टर उडवणे. यासाठी काय उद्योग केले जातील याचा नेम नव्हता. कुणी नवपरिणत जोडपे वा गावात बदलून आलेले तरूण जोडपे असले की त्याला खूप त्रास दिला जाई. हे जोडपे झोपी गेले की टारगट मंडळी त्यांच्या घराला कडी लावत. शिवाय एक दोरी घेऊन त्या कडीला मोठा दगड बांधत. नंतर ती दोरी लांबून नेऊन ओढली जात असे. खड खड आवाज येऊन ते जोडपे बिचारे वैतागून जात असे आणि बाहेर येण्याची सोय नसे. मला आठवतंय. एका घरात एक प्रोफेसर जोडपं रहात होतं. त्यांच्या घरावर अल्युमिनियमचे पत्रे होते. त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या घरची कडी लावली जायची. मग लांबून त्यांच्या घरावर छोटे दगड फेकले जायचे. धाड धाड आवाज येऊन ते जोडपं पार वैतागून गेलं होतं. जे मिळेल ते पळवणं आणि होळीत टाकणं हे मोठ्या शौर्याचं लक्षण होतं. त्यामुळे काही पोरं त्या कामात गुंतलेली असायची.
हे सुरू असताना होळीवर गप्पांची मैफलही रंगलेली असायची. मग काही मुलं गावातल्या सगळ्या होळींचा फेरफटका मारत असत. मग जातांना प्रत्येक होळीवर थांबून गप्पा मारल्या जायच्या. शिवाय प्रत्येक होळीवर गेल्यावर कचकचीत शिव्या देणं ही प्रथाही आवर्जून पाळली जायची. लहानपणी शिव्यांची एवढी 'दोस्ती' नसल्याने अनेक शिव्यांचे अर्थ कळायचे नाही. मग कधी कधी त्या शिव्या दिल्या की घरातल्यांचा पाठीवर सणसणीत धपाटा बसायचा.
रात्रभर होळी जागवल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी घरातलं पाणी तापवायचं पातेलं होळीवर नेऊन तापवलं जायचं. त्यावर तापवलेल्या पाण्यानेच घरातल्या सगळ्यांच्या अंघोळी व्हायच्या. या गावातली लहान मुलं आणखी एक 'उपक्रम' राबवायची. हा उपक्रम म्हणजे सगळी मुलं मुख्य चौकात रस्ता अडवून उभी रहायची आणि येणार्या जाणार्याकडून 'पोस्त' (पैसे) घ्यायची. पोस्त घेतल्याशिवाय कुणालाही सोडलं जात नसे.
होळी म्हटलं की ही सगळी मजा आठवते. लहानपणी केलेल्या गमती-जमती, करामती, पराक्रम सगळं काही आठवतं. त्यावेळी लोकांना जो त्रास दिलं त्याविषयी आज वाईट वाटत असलं तरी ती त्यावेळची मजा होती. सगळे लोक एकत्र यायचे. आनंदाने होळी साजरी करायचे. 'आमची होळी' असा एक अभिमानही असायचा. पुढे शहरात आल्यानंतर हे सगळं संपलं. होळी म्हणजे बिल्डिंगच्या पुढे एक खड्डा खणून चार दोन लाकडं आणून थोड्यावेळासाठी आग निर्माण करणं एवढंच राहिलं. ते ठीक आहे, पण त्या गप्पा, गंमत-जंमत हे सगळं सगळं गावाबरोबर गावातच राहिलं.

वाहतुकीची 'यातायात'
महाराष्ट्रात रहात असल्याचा आपल्याला अभिमान असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली प्रगती, सुव्यवस्था, (पैसे खाल्ले जात असलं तरी) जपलं जाणारं कायद्याचं राज्य वगैरे वगैरे आपल्या अभिमानाची ठळक स्थळं असतात. ही सगळी अभिमानस्थळं किती सार्थ आहेत, हे महाराष्ट्रात राहून नाही कळत. त्यासाठी महाराष्ट्राबाहेर पडावं लागतं. दक्षिणेतलं माहित नाही. पण उत्तरेत गेल्यानंतर तर हा अभिमान रास्त नसून अत्यंत योग्य असल्याचा भाव आपोआप मनी दाटायला सुरवात होतो.
सध्या अस्मादिकांचं वास्तव्य इंदूर शहरात आहे. एरवी इंदूरची आपल्याला ओळख खवय्यांच शहर असं आहे. शिवाय तिथं असलेल्या मराठी मंडळींमुळे आपल्या मनात त्याच्याविषयी एक हळवा कोपरा आहे. पण इंदूरच्या मराठी संस्कृतीवर 'हावी' झालेली हिंदी संस्कृती पाहिली की मग मात्र, तोपर्यंत चढलेला अंमल खाडकन उतरतो.
हे शहर मध्य भारतातल्या शहरांमधलं मोठं शहर आहे. २५ लाखांपर्यंत वस्ती आहे. पण नियम, कायदा या बाबी कशाशी खातात, हे इथल्या लोकांना अजिबात 'ठाव' नाही. इंदूरमध्ये गाडी चालवणं म्हणजे किती 'यातायात' असते ते गाडी चालवल्याशिवाय कळत नाही. कदाचित म्हणूनच 'पुलं'नी म्हटल्याप्रमाणे हिंदीत वाहतुकीला 'यातायात' म्हणत असावेत, हे शंभर टक्के पटतं.
महाराष्ट्रात तुम्हाला वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय असेल तर इंदौरमध्ये ( हा इथला उच्चार) गाडी चालवताना चुकूनही त्या फंदात पडू नका. अन्यथा समोर दिसलेला लाल दिवा पाहून तुम्ही गाडी थांबवलीत तर तुम्हाला मागच्या गाडीने उडवलं म्हणून समजा.
इथे शुभ्र वाटणारा असा शर्ट, निळी पॅंट आणि निळी टोपी असलेले, ज्यांना वाहतूक पोलिस की कायसं असं म्हणतात, ते लोक दिनवाण्या चेहर्यानं रंगनिदर्शक दिव्याखाली ( सिग्लन) किंवा कुठल्याही रस्त्याच्या आडोशाला उभे असतात. वाहतुक सुरळीत करणे आणि ती शिस्तीत बसवणे ही कामे आपली नाहीत बॉ अशी त्यांची ठाम समजूत असते. त्यामुळे ते त्या भानगडीत पडत नाहीत.
माझ्या एका महाराष्ट्रातून आलेल्या मित्रानं एकदा सिग्नल पडल्यावर गाडी थांबवली, तसे इथले पोलिसकाका धावत आले आणि 'साब, गाडी मत रूकाना. आते आते दिया लाल हुआ तो भी निकल जाने का. नही तो पीछेसे आनेवाली गाडी आपको उडा दे सकती है' असे सांगून नियम पाळण्याचा आगाऊपणा करू नका असे अप्रत्यक्षणे सांगत निघून गेले.
विशेष म्हणजे एका चौराह्यावर (चौकात) चार चार असे पोलिस असूनही त्यांचा अजिबात 'दाब' पडत नाही. त्यांना फाट्यावर मारून लोक सर्रास सिग्नल तोडून धुर्राट पुढे निघून जातात. रस्ता हा आपल्या 'तीर्थरूपांनी' आपल्याला दिला आहे, अशी या सर्व प्रकारच्या वाहनचालकांची ठाम समजूत असते. वाहतूक पोलिस आपल्या (उघड्या) डोळ्यांदेखत हे सारे काही निर्ममपणे पहात असतो. या पोलिसांची दादागिरी चालते ती सायकलस्वारांवर 'ए पीछे जा साले' इथपर्यंत ते त्याला दम देतात.
आपल्याकडे पोलिस खात्याच्या आणि स्वतःच्याही निधीत भर घालण्याचा जो उद्योग पोलिसकाका करत असतात, तो सहसा इथे दिसत नाही. कदाचित त्यामुळेही शिस्त बसत नसावी. तसे केल्यास त्यांना फाट्यावर मारणारी 'जन्ता'ही इथे आहे. त्यामुळे पोलिसही त्या भानगडीत पडत नसावेत. त्यांचा हा उद्योग चालतो तो हायवे परिसरात. एरवी मुख्य शहरात तरी असे चित्र पाहण्यास मी उत्सुक आहे.
माझी महाराष्ट्र पासिंगची गाडी घेऊन मी बिनधास्त शहरभर हिंडत असतो. गेल्या दहा महिन्यात माझं एकदाही लायसन्स तपासलं गेलं नाही. गाडीची कागदपत्र तपासली गेली नाहीत. मुद्दाम पोलिसासमोर गाडी नेऊनही पाहिली, तरीही त्या दयाळू इसमांनी गाडीकडं ढुंकूनही पाहिलं नाही.
एकूणच इथल्या वाहतुकीच्या परिस्थितीमुळे अपघाताचं प्रमाण बरंच आहे. इथल्या नई दुनियाचं पहिलं पान उघडून आत शिरलं की सगळ्या अपघाताच्या बातम्या दिसतात. नियम न पाळणार्या इथल्या लोकांवर सुरवातीला खूप संताप यायचा. पण हळू हळू मी तो संताप कमी केला आणि किमान वैयक्तिक नियम पाळायचं ठरवलं. पण त्याचेही अनुभव उलटे आले. आता सिग्लन सुटल्यानंतरही बिनदिक्कतपणे गाडीस्वार पुढे जातात हे पाहिल्यावर जीवाच्या भीतीपोटी का होईना माझाही पाय हल्ली एक्सलेटर कधी दाबतो ते मलाही कळत नाही.

वृत्ती- प्रवृत्ती
प्रसंग पहिला
औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली.
वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय. त्यात जोरदार पाऊस सुरू झालेला. त्यामुळे रिक्षावाला बरोबर नेतोय या विश्वासात काही बोललो नाही, पण आत गेल्यानंतर तोही गोंधळलेला दिसला. मग पावसापासून बचावासाठी झाडाखाली उभ्या राहिलेल्या काही जणांना आंबेडकर कॉलेज कुठे आहे विचारलंय. त्यांनी गेटमधून बाहेर पडल्यानंतर शेजारीच कॉलेज असल्याचे सांगितले.
मी रिक्षावाल्यावर आणि स्वतःवरही चरफडलो. कारण बोर्ड मी पाहिला होता, पण त्याचवेळी त्याला सांगितलं नव्हतं. माझ्या चरफडण्यावर रिक्षावाल्याच्या चेहर्यावर अजीजी दिसली. 'साहेब, वाचता येत नाही ना म्हणून गलती झाली.' मला उगाचच कसं तरी वाटलं. मग मी त्याला काही बोललो नाही. त्याने आंबेडकर कॉलेजमध्ये रिक्षा नेली. माझं काम अगदी थोड्या वेळाचं होतं. तिथून आणखी एका ठिकाणी जायचं होतं. पाऊसही सुरूच होता. त्या रिक्षावाल्यालाच विचारलं 'थांबणार का?' त्याने हो म्हटलं. त्याला काही पैसे देऊ केले. पण त्याने नाकारले. 'साहेब, तुम्ही या मी इथेच थांबतो,' म्हणून तो तिथेच थांबला. मी काम आटोपून बाहेर आलो. तिथून आम्ही आणखी दोन तीन ठिकाणी गेलो. तिथं त्याला थांबावही लागलं.
शेवटी हॉटेलपाशी येऊन रिक्षा सोडली तोपर्यंत किमान पंधरा-वीस किलोमीटर तरी फिरलो होतो. बिल विचारल्यावर त्याने काही तरी आकडेमोड करून शंभर रूपये बिल झाल्याचं सांगितलं. बिलाचा हिशेब सांगताना रिक्षावाला म्हणाला, 'साहेब, गलतीने विद्यापीठात तुम्हाला घेऊन गेलो. तेवढे पैसे बिलातनं वजा केलेत.' मी त्याच्या त्या बापुडवाण्या पण प्रामाणिकता ओथंबून वाहणार्या चेहर्याकडे पहातच राहिलो.
------------------------
प्रसंग दुसरा, त्याच दिवशीचा.
औरंगाबादला आलोच आहोत, तर पैठणला एकनाथ महाराजंची समाधी पहावी म्हणून तिकडे गेलो. मंदिर बघितल्यानंतर नाथसागर उद्यानात गेलो. रात्रीचे आठ वाजले होते. नाथांचं गावातलं घर पहायचं होतं. ते पाहून मग स्टॅंडवर येऊन एसटी पकडून औरंगाबादला परतायचा इरादा होता.
उद्यानाबाहेरच एक रिक्षावाला भेटला. तीस रूपये कबूल करून घेऊनच त्याने रिक्षा सुरू केली. जाता जाता त्याची टकळी सुरू झाली. नाथांच्या आयुष्यातील चमत्कार कुठे घडले, कसे घडले याची माहिती सांगू लागला. ते सगळं माहित होतं. पण पहिल्यांदाच ऐकतोय असा चेहरा करून 'बरं, काय म्हणता, बापरे' अशा प्रतिक्रिया देत होतो. जाता जाता रिक्षावाला म्हणाला, 'बरं झालं, तुम्ही आमच्या गाडीत आलात. मुसलमानाच्या रिक्षात बसला असतात तर त्याने तुम्हाला फक्त नेऊन सोडलं असतं. बाकी काही सांगितलं नसतं. त्यांना फक्त धंद्याशी मतलब.'
'मुसलमान रिक्षावाले आहेत इथे?' मी विचारलं.
'तर, भरपूर आहेत. पण नाथसागर गार्डनला आम्ही त्यांना येऊ देत नाही. इथे सगळे हिंदू रिक्षावाले आहेत. गावात रिक्षा फिरवणार्यात मुसलमान आहेत.' त्याने माझ्या माहितीत भर घातली.
'आपल्या धर्माचं त्यांना काय माहित. फिरवायचं म्हणून ते फिरवतात,' त्याने मुक्तपणे आपली मतं उधळली.
मी 'हं' म्हणत होतो.
नाथांच्या वाड्यात गेल्यानंतर त्यांच्या देवघराचं दर्शन घेतलं. तिथेच त्या वाड्यात नाथांचे वंशज रहातात. त्यातले बाराव्या आणि तेराव्या पिढीचे वंशजही भेटले. दोघेही वृद्ध होते. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी एकूणच नाथांविषयी आणि वंशजांविषयी माहिती दिली. आम्हाला बरं वाटलं. रिक्षावालाही बरोबरच होता. 'तुमच्यामुळे मला पण ही माहिती मिळाली. एरवी ही माणसं भेटत नाहीत,' असं म्हणून त्याने आमच्या अंगावर उगीचच मूठभर मांस चढवलं.
दर्शन आटोपल्यानंतर जवळच नवनाथांच्या तपर्श्चर्येची जागा आहे, तुम्हाला दाखवतो, असं म्हणून त्याने आम्हाला तिथे नेले. तिथे खाली छोट्या गुहांमध्ये नवनाथांच्या मूर्ती तयार करून नऊ ठिकाणी ठेवल्या होत्या. आम्ही आडवे तिडवे होऊन त्या गुहांमध्ये उतरून प्रत्येक नवनाथाचं दर्शन घेत होतो. खूप भाविक असल्याचं 'बेअरींग'ही सांभाळून होतो. गेल्या गेल्या रिक्षावाल्याने पुजार्याला बोलवून त्याच्या 'उत्पन्ना'ची सोय केली होती. त्यामुळे दानपेटीत पैसे टाकणंही आलंच होतं. आम्ही भराभर दर्शन घेऊन तिथून अखेर निघालो. स्टॅंडवर येऊन औरंगाबादची गाडी पकडायची होती.
जाता जाता रिक्षावाला म्हणाला, 'सगळ्या नाथांनी इथेच येऊन तपर्श्चर्या केली. फार पवित्र स्थान आहे हे. तुमचं भाग्य म्हणून तुम्ही आज इथे आलात आणि मला भेटलात.' आम्हाला हे दर्शन घडविण्याचे श्रेयही त्याने स्वतःकडे घेऊन टाकले होते. रिक्षा स्टॅंडवर पोहोचली आणि खिशात हात घालून पैसे किती म्हणून विचारलं. त्याने आकडा फेकला 'ऐंशी रूपये'. मी त्याच्याकडे पहातच राहिलो.
म्हटलं, अहो, आपण चार किलोमीटरही फिरलो नाही. आणि ऐंशी रूपये?
तो म्हणाला, 'साहेब, रात्रीच्या वेळी एवढ्या लांब कुणी येत नाही. तुम्हाला बरंच फिरवलं की. शिवाय वेटींगही आहेच ना.'
मी चकीतच झालो. चरफडत ऐंशी रूपये त्याच्या हातावर टेकवले आणि समोर उभी असलेली औरंगाबाद गाडी पकडली. जाता रिक्षावाला म्हणाला, 'साहेब ओळख ठेवा. कुणाला घेऊन औरंगाबादला आला तर आपल्या रिक्षातच या'.
त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या चेहर्यावर काही भावच उरले नव्हते.
माझ्या हिंदीचा बोलु कवतिके
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो.
इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच. ऑफिसातून घरी परतताना एका दुकानासमोर गेलो आणि एकदम बोललो 'एक किलो तूप देना'. त्याला काही कळेचना. बरं तो माझ्याकडे विचित्र नजरेने पहायला लागला. मला कळेचना काय झालं. मग माझ्या लक्षात आलं. तुपाला हिंदी दुसरंच काही तरी म्हणतात. मग मी काय म्हणतात ते आठवायला लागलो. जाम आठवेचना. मग त्याच्या दुकानावर नजर फिरवायला लागलो. तेव्हा 'घी' असं नाव दिसलं. तेव्हा जीवात जीव आला आणि त्याला 'घी' द्यायला सांगितलं. त्या माणसाची विचित्र नजर त्यानंतरही कायम होती.
एकदा असंच बायकोने मिरे आणायला (वाटायला नव्हे) लावले. दुकानात गेलो. त्याला सांगितलं, 'मिरे द्या'. तीच गत. त्याला काही कळेचना. मग मी त्याला त्या मिर्यांचं वर्णन करायला लागलो. 'वो नहीं क्या काले काले होते है. गोल गोल दाने होते है'. माझ्या या वर्णनावरून त्याला बहुधा अदमास आला असावा. मग त्याने समोरच्या कपाटातून एक छोटा खोका काढून दिला. त्यावर लिहिलं होतं, 'काली मिर्च'. खाली चित्रही होतं. मी मनातल्या मनात 'हुश्श' म्हटलं. आणि त्याला 'यहीच देना' असं म्हणून घाम पुसला.
संक्रांतीच्या वेळीही असंच झालं. हलवा किंवा साखरफुटाणे हे घ्यायला दुकानात गेलो. तर त्याला नेमकं काय म्हणतात ते माहित नव्हतं. दुकानात एका टोपलीत हलवा ठेवलेला होता. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. मग दुकानदारालाच विचारलं याला काय म्हणतात? त्यानं सांगितलं, 'चिरोंजी के दाने.' हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला. त्यामुळे हलवा समोर दिसला नसता तर कितीही डोकं खाजवलं असतं तरी त्याला हिंदीत काय म्हणतात ते आठवण्याचा प्रश्नच नव्हता.
अशाच एका सणाच्या दिवशी म्हणजे मराठमोळ्या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हटलं बासुंदी आणूया. दुकानात गेल्यानंतर त्याला बासुंदी सांगिल्यानंतर ठार काही कळेना. म्हटलं 'वो दूध की होती है. उसको नहीं क्या आटाते है' ( आता आटवणेला हिंदीत काय म्हणतात हे पार 'आटवेना') त्याचा चेहर्यावरचा मख्खपणा कायम. मग मी दृश्य माध्यमाचा आधार घेऊन त्याच्या दुकानातली प्रत्येक मिठाई पहायला लागलो. एका ठिकाणी बासुंदीसारखं दिसंल. त्यावर तो म्हणाला ही रबडी आहे. म्हटलं ठिक आहे. चालेल दे बाबा. बासुंदी आटीव असली तरी ती घट्ट नसते. इथे रबडीचे 'लच्छे' असतात. आम्ही बासुंदीची तहान रबडीवर भागवली.
भाजीच्या बाबतीतही तेच. आलू, बैंगन, प्याज, गाजर इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. (थॅंक्स टू बॉलीवूड) पण त्यापुढे जायचं असेल तर मात्र आपला 'भाजीपाला' होतो. भाजीसाठी 'सब्जी' हा शब्द असला तरी तो साधारणपणे तयार केलेल्या भाजीसाठी वापरतात. बाजारात भाजी आणायला गेल्यास 'तरकारी' शब्द प्रचलित आहे. मी तर हल्ली भाजी आणायला गेलो की समोर 'वो देना' असंच म्हणतो. कारण अनेकदा नावच माहित नसतं. दुधी भोपळ्याला इथे 'लौकी' म्हणतात हे कळल्यामुळे मला अगदी 'लकी' असल्याचं वाटलं. त्याचवेळी मटारला 'बटला' आणि डांगराला कद्दू म्हणतात हे ज्ञानही काही काळानंतर झालं. कोथींबिरीला 'कोथमीर' असाही हिंदी शब्द असला तरी इथे तिला तिच्या मातृकुलाच्या नावाने म्हणजे 'धनिया' म्हणून ओळखले जाते. फळांच्या बाबतीतही तेच. सफरचंदाला सेब, आंब्याला आम हे माहित असलं तरी पेरूला इथेही 'जांब' असे म्हणतात हे नव्यानेच कळलं. जांब हा उच्चार ग्रामीण महाराष्ट्रात मी ऐकला होता.
खाद्यपदार्थांच्या बाबतीतही ती अडचण येते. आपल्याकडे बाराखडीत 'व्यंजन' असते, इथे पदार्थांनाच 'व्यंजन' म्हणतात. आपल्याकडचा वडापाव इथे 'बडापाव' होतो. इथे बिना तला समोसा म्हणजे आपल्याकडचं बटाट्याची भाजी असलेलं पॅटीस त्रिकोणी आकारात दिलं जातं. एरवी पॅटीस म्हणून आपण जे खातो त्याला इथे 'टिकीया' म्हणतात. ती आलूपासून बटल्यापर्यंत कशाचीही असते. साखरेच्या पाकाला इथे 'शक्कर की चाशनी' म्हणतात. उडाली की नाही विकेट? आणि बिटाला काय म्हणतात माहितेय? 'चुकंदर'...
सगळ्यात पंचाईत डॉक्टरकडे गेल्यानंतर होते. एखादी भावना त्या हिंदी भाषक डॉक्टरला कशी समजून सांगावी ते कळत नाही. डोकं भिरभिरतंय ला 'सर चकराता है' हे सांगू पण डोक्यात घण घातल्यासारखं दुखतंय हे 'सरदर्द' या शब्दातून नेमकं कसं व्यक्त होणार? 'पेटदर्द' सांगू शकतो, पण 'पोटात ढवळून येतंय' हे कसं सांगणार? तोंड आल्याला 'मूह आया' असाच भाषांतरीत शब्द आहे हे कळल्यानंतर आश्चर्यच वाटलं होतं. अवयवांच्या बाबतीत तीच स्थिती. टाच, कोपर, गुडघा, पोटर्या या अवयवांच्या बाबतीत काही सांगायचं तर प्रत्यक्ष तो अवयव दाखवून सांगावं लागतंय. काही भावना इंग्रजीचा आधार घेऊन किंवा काही जवळपास जाईल असा हिंदी शब्द शोधून सांगत आम्ही निभावून नेतोय.
हिंदीच्या अशा अनेक गमती जमती नंतर हळूहळू कळत गेल्या. इथे वाहतुकीची 'यातायात' कशी असते ते वर्षभरात कळून चुकले आणि नियमात चुकल्यानंतर 'यातायात पोलिस' इथे 'चालान' करतात याचा अनुभवही आला. आपल्याला चांगल्या गोष्टीचं समाधान मिळतं, इथे प्रश्नाचं 'समाधान' असतं. आपल्याकडे एखादी गोष्ट करण्यासाठी 'अवकाश' असतो. इथे सुटीच्या दिवशी 'अवकाश' असतो. आपल्याकडे 'भोग' भोगावे लागतात इथे देवाला चढवतात. आपल्याकडे संकष्टीपासून सोमवारचे 'व्रत' असते. इथे उपास असला की 'व्रत' असतं. आपण कुठल्याही गोष्टीची 'चिकित्सा' करतो, इथे डॉक्टर करतो ती 'चिकित्सा' असते आणि खुद्द त्याला 'चिकित्सक' म्हणतात. आपल्याकडे दोषींना 'शिक्षा' होते इथे मुलांना 'शिक्षा' दिली जाते.
थोडक्यात काय आम्ही अशा अनेक गमती जमतीतून हिंदी शिकत आहोत. महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांना मराठी येवो न येवो पण आम्ही मात्र हिंदी नक्की शिकणार.

संवादाचा सुवावो ढळे
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले. पुढे 'मोगला फुलला' ही ध्वनिफित ऐकली नि ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीवरचा त्यांचा अभ्यास, त्यातल्या प्रत्येक शब्दाची केलेली फोड आणि त्याचा त्यांनी सांगितलेला अर्थ पाहून चकीत व्हायला झालं. या माणसाकडे किती नि काय काय भरलं आहे, याची जाणीव झाली नि मन त्यांच्याविषयीच्या नम्रतेने भरून गेले. इंदूरला आल्यानंतर गेल्या वर्षी इथल्या महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे कार्यक्रम झाला. ज्ञानेश्वरीवरचेच निरूपण होते. पण हॉल तुडुंब भरला होता. लोकही अतिशय श्रद्धेने आणि लक्षपूर्वक ऐकत होते. तीन दिवस हा शब्दसोहळा चालला. या काळात त्यांना भेटायचं होतं, असं ठरवलंच होतं. एका कार्यक्रमानंतर थेट स्टेजवर गेलो नि माझा परिचय दिला. त्यांनी माझं नीट ऐकून घेतलं. मग मला शेजारीच बसवून घेतलं. हा अनौपचारिकपणा फारच भावला. मग एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात तसं बोलायला सुरू केलं. विषय मराठी भाषेचाच निघाला. हिंदी प्रांतात मराठी बोलणार्यांविषयी त्यांना खूप आस्था वाटली. मराठी कशी टिकतेय हे दाखवून ते म्हणाले, मराठीच्या मृत्यूची भीतीबिती बाळगायचं काही एक कारण नाही. ही सगळी शहरी भूतं आहेत. अशा बातम्या फक्त शहरात चर्चिल्या जातात. ग्रामीण भागात हीच भाषा प्रभावी नि प्रवाहीपणे बोलली जातेय. शहरात भाषक संक्रमणामुळे त्यात अनेक शब्द जोडले जात आहेत. पण शहरात अस्सल ग्रामीणपणा लेवून ही भाषा बोलली जातेय.'
इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्याचा विषयही मग निघाला. ते म्हणाले, 'इंग्रजी शिकण्याची धडपड शहरी भागातच आहे. ही सगळी प्रतिष्ठेची धडपड आहे. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून इंग्रजीत शिक्षण घेण्याचा प्रकार वाढत चालला आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला मर्यादा आहेत, हे खरे. पण केवळ त्यामुळे इंग्रजी स्वीकारून मराठीला लाथाडणे योग्य नाहीये. त्यांचा विरोध इंग्रजी शिकण्याला नव्हताच.
हाच धागा धरून मी बोलता बोलता हळूच वैयक्तिक विषय काढला. म्हटलं मी सध्या इथं रहातोय. पण उद्या पुन्हा महाराष्ट्रात गेलो तर मुलीला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा प्रश्न मला नि माझ्या बायकोला पडलाय. या विषयावर खल करून नि पुष्कळ वाचून आमचाच गोंधळ झालाय. काय करू? माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, हे बघ, तुम्ही घरात कोणती भाषा बोलताय यावर अवलंबून आहे. घरी मराठीतच सगळे व्यवहार चालत असतील तर तिची शाळा इंग्रजीत असल्याने काहीही फरक पडत नाही. शेवटी इंग्रजीच्या शिक्षणाने तिला नोकरी मिळणार असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे. पण घरात सर्व व्यवहार मराठीत हवेत. त्यामुळे ती मराठीपासूनही दूर जाणार नाही.' बोलता बोलता त्यांनी मला वाट दाखवून दिली होती.
मग मी नाशिकचा म्हटल्यावर विषय कुसुमाग्रजांचा निघाला. कुसुमाग्रजांविषयी त्यांना खूप ममत्व. त्यांच्या प्रेमापोटी ते अनेकदा नाशिकला येत होते. त्यांच्या काही आठवणीही सांगितल्या.
पुढे त्यांना एका स्थानिक लेखक स्नेह्याची घरी जायचं होतं. त्यांना चालायला अडचण होत होती. म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवत ते सावकाश गाडीत जाऊन बसले.
त्या पुसट होत जाणार्या गाडीकडे मी निवांतपणे पहात बसलो. दहा मिनिटांचा हा सहवास माझ्यात काही चैतन्य सांडून गेला. समुद्राच्या पाण्याचे चार शिंतोडे जणू अंगावर पडल्यासारखं वाटलं. एरवी स्पर्श या भावनेविषयी आपण किती कोरडे असतो. पण त्यांचा स्हेनल स्पर्श मला झालाय ही भावनाच मला खूप दिवस पुरून उरली. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकली नि माझ्यात सांडलेलं त्यांच्या स्पर्शाचं चैतन्य जागं झालं. 'हात आपसूकच संगणकाकडे वळला. 'मोगरा फुलला' लावलं नि त्यांच्या चिरपरिचित आवाजाचा स्पर्श कानात अल्लद शिरला.
रामभाऊ गेले तरी त्यांचं चैतन्य कायम आहे. ते सगळ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारात सांडलंय. पुस्तकात. आवाजात. गाण्यात. निरूपणात. आणखी कशाकशात. त्यातला एक कण माझ्यातही आलाय.
श्रीमंती यापेक्षा काही वेगळी असते का?
Subscribe to:
Posts (Atom)