चीनविरूद्धच्या १९६२ च्या युद्धात झालेला भारताचा पराभव जिव्हारी लागला आहे. ४७ वर्षे झाली तरी आपण ते दुःख विसरू शकलो नाही. भारताच्या प्रतिष्ठेला लागलेला हा डाग अजूनही निघालेला नाही. पण १९६२ च्या संघर्षाकडे केवळ सीमाप्रश्नातून उद्भवलेला वाद असे पाहणे योग्य ठरणार नाही. आशियात शक्तीशाली कोण हे ठरविणार्या स्पर्धेचा तो पहिला अंक होता.
विसावे शतक स्वातंत्र्याचे वारे घेऊन अवतरले. अनेक देश साम्राज्यवादी देशांच्या पकडीतून मुक्त झाले आणि त्यांनी स्वातंत्र्याचा श्वास घेतला. भारत आणि चीनही आगे-मागे स्वतंत्र झाले. या दोन्हीही अवाढव्य देशांच्या सीमा मात्र ठरवल्या होत्या त्या त्यांच्यावर राज्य करणार्या साम्राज्यवादी देशांनी. १९४९ मध्ये स्वतंत्र झालेल्या चीनने लगेचच आपल्या सीमांची पुनर्रचना करायला सुरवात केली. त्यासाठी पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भारताशी बोलणीही सुरू केली. ही बोलणी म्हणजे केवळ सीमाप्रश्न नव्हता, तर आपला गेलेला परिसर परत मिळविण्याची आकांक्षा त्यात दडलेली होती.
त्यावेळी भारताने पाकिस्तानला फार गंभीरपणे घेतले नाही, असे पाश्चात्य जगतातील विद्वानांचे मत आहे. भारतासारखाच समाजवादी चीन आपल्यावर हल्ला करेल, असा विचारही स्वप्नाळू पंडित जवाहरलाल नेहरूंना यांनी केला नाही. हिमालयाची भिंतच आपल्या संरक्षणासाठी पुरेशी आहे, असे त्यांना वाटत होते. चीनची धोरणे आणि लष्करी क्षमता नेहरूंच्या कधी लक्षातच आली नाही. राजनैतिक पातळीवर नेहरू चीनला कमी लेखत राहिले आणि हे संबंध युद्धाच्या रूपाने जमिनीवर उतरले त्यावेळी भारतीयांना आपली जमीन सोडून पळावे लागले.
भारतीयांच्या या प्रतिकारामुळे (?) चीन भारताला कमकुवत समजला हा त्यांचा दोष नाही. पण भारताच्या नमतेपणाची सुरवातही नेहरूंनी १९५१ मध्ये घातली होती. भारत आणि चीन यांच्यात 'बफर स्टेट' म्हणून असलेले तिबेट चीनने बळकावले आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या भारताने आपले हात वर केले. नेहरूंना चीनच्या भावी चालीचा अंदाजच त्यांना आला नाही. चीनला विरोध करण्याऐवजी दलाई लामांना त्यांनी भारतीय भूमीवर आश्रय तेवढा दिला. १९५९ मध्ये चीनने तिबेटमधले बंडही अतिशय क्रूरपणे मोडून काढले, त्यावेळीही नेहरू शांत बसले.
नेहरूंनी तिबेटप्रश्नी चीनच्या पायी लोटांगण घालून १९५४ मध्ये करार केला आणि शांतीपूर्वक परस्पर साहचर्याची पंचशील तत्वे जाहिर केली. पण हीच पंचशील तत्वे म्हणजे भारताचा दुबळेपणा अशी व्याख्या चीनने केली.
नेहरूंना तिसर्या जगाचे नेते होण्याची आस लागली होती. ही आस पूर्ण करण्यासाठीचे साधन म्हणजे पंचशील तत्वे होती. परस्परांचा आदर, शांततापूर्वक अस्तित्व, परस्परांच्या भानगडीत नाक न खुपसणे ही त्यातली काही तत्वे होती. नेहरूंनी पुढच्याच वर्षी ही तत्वे आफ्रो आशियाई एकात्मता चळवळीत आणि बांडुंगला भरलेल्या तटस्थ देशांच्या परिषदेतही फडकावली. त्या जोरावर त्यांनी अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धात तिसर्या जगातील देशांचा एक तटस्थ समूह तयार केला आणि त्याचे एक महत्त्वाचे नेते बनले. चीनचे नवे नेतेही त्यांनीच या परिषदेत जगापुढे आणले. 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणाही याच काळातली.
पण चीनचा हुकूमशहा माओ याला मात्र नेहरूंचे वाढते वर्चस्व खुपत होते. आशियात वसाहतवाद झुगारून स्वातंत्र्य झालेल्या देशांत चीनच ताकदवान असल्याची त्याची समजूत होती. चीनचे महत्त्व कुणी डावलू नये असे त्याचे म्हणणे होते. भारताशी सीमाप्रश्न उकरून त्याने भारतालाही हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवाने नेहरूंना माओ आणि पर्यायाने चीनचा डाव समजलाच नाही. बंधुभावाच्या संकल्पनांमध्येच ते मग्न राहिले. तिसर्या जगाचे नेतृत्व आपल्याकडे येईल या स्वप्नातही ते दंग होते. तिकडे चीन मात्र स्वतःचे नेतृत्व पुढे आणत होता.
त्याचवेळी चीनने भारताला कमकुवत करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. चीनने पाकिस्तानला आर्थिक, लष्करी सर्व मदत करून भारताविरोधात भडकावले. त्यामुळेच फाळणीनंतर पाकिस्तानबरोबर भारताची तीन युद्ध झाली. यासाठी पाकला झालेला शस्त्रपुरवठा बव्हंशी चीननेच केला होता. शिवाय पाकबरोबरच्या या तणावने भारताला आपले लाखो सौनिक सीमेवर तैनात ठेवावे लागले. एवढ्या मनुष्यबळाचा केवढा हा अपव्यय!
दुसरीकडे चीनने भारताचा उपखंडातील प्रभावही मर्यादीत करायला सुरवात केली. आता नेपाळ आणि म्यानमार यांना चीनने आपल्या बाजूने वळविले आता भूतान आपल्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे. नेपाळ आणि म्यानमानरला चीनने सर्व ती मदत केली. नेपाळमध्ये सध्या सर्व पायाभूत कामे चिनी मदतीने होत आहेत. म्यानमारमध्ये तळ उभारून हिंदी महासागरातही चीनने आपले अस्तित्व निर्माण केले. पाकिस्तान हा तर चीनचा दोस्त आहेच. तिथेही चीनने तळ उभारल्याचे बोलले जाते. श्रीलंकेलाही एलटिटिईच्या संघर्षात चीननेच गरज पडेल ती लष्करी मदत केली. भारताच्या सर्व शेजार्यांना आपल्या हाताशी धरून चीनने भारताला अशांत कसे करता येईल, याचे चोख नियोजन केले आणि त्यावर अंमलबजावणीही सुरू आहे. भारताला उपखंडातच मर्यादीत करण्याचा चीनी डाव सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसते आहे.
तात्विक, आर्थिक आणि राजकीय, कुठल्याही दृष्टिकोनातून विचार केल्यास आज चीनने भारतावर मात केल्याचे दिसून येईल. चीनची उद्दिष्ट्ये स्पष्ट होती. त्यांना श्रीमंत आणि ताकदवान देश बनायचे होते. ते उद्दिष्ट त्यांनी साध्य केले. या उद्दिष्टाच्या आड येणार्या अडचणी त्यांनी हरप्रकारे दूर केल्या. त्यासाठी विचारसरणीही सोडली. एकाकाळी कवटाळून धरलेली साम्यवादी विचारधारा आणि समाजवादी अर्थव्यवस्था सोडून राष्ट्रीयतेचा आणि भांडवलशाहीचा हात धरला. तैवान आणि दक्षिण चिनी समुद्रातील बेटांचा प्रश्नही तात्पुरता थंड बस्त्यात बांधून ठेवला. शिवाय पुरेपूर संधीसाधूपणाही अंगी बाणवला. जागतिक पातळीवर परिस्थितीनुरूप कधी रशिया तर कधी अमेरिकेचा हात धरण्यातही कमीपणा मानला नाही. आर्थिक विकासाच्या नावाखाली हे सारे काही त्यांनी केले.
चीनने नेहरूंची पंचशीलेही अंगीकारली. पण वेगळ्या अर्थाने. बांडुंगमध्ये रूजलेले तटस्थतेचे बीज त्यांनी आशियातील नव्या सत्तांचा क्रम ठरविण्यासाठी उपयोगात आणले. अर्थात, त्या पंचशीलांचा अर्थ आता बदललाय. आता बहुदेशीय संघ, परस्पर सहकार्य, आर्थिक विकास आणि सुरक्षितता हे या पंचशीलांचे आधार बनले आहेत. शीतयुद्धाच्या काळात असलेली दोन सत्ताकेंद्रे आता बहुदेशीय सत्ताकेंद्रात परिवर्तित व्हावीत आणि आर्थिक संरक्षण सहकार्य हे त्याचे आधार असावेत, असे चीनचे उद्दिष्ट आहे.
याचा अर्थ भारत आता शांत बसला आहे, असे नाही. तटस्थ राष्ट्रांच्या काळात तयार झालेली छबी पुसून भारतही आता स्वतःचा गट तयार करतो आहे. गेल्या काही काळात स्वतःचा एक संघ बांधण्याचा प्रयत्नही भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर केला आहे. अमेरिकेशी संबंध जुळवताना झालेला अणू करारही महत्त्वाचा आहेच. शिवाय रशियाशी जुने संबंधही टिकवून आहे. त्याचवेळी फ्रान्स, इंग्लंडसह अनेक देशांना वळवून घेत ब्राझीलसह नव्या शक्तींनाही आपल्या कवेत घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यामुळे १९६२ चा अर्धजागृत भारत आता राहिलेला नाही. लष्करी आणि राजनैतिक दृष्ट्याही तो कुमकुवत राहिलेला नाही.
आता खरं तर पाश्चात्य जगताने भारताला बळ देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आशियातील सत्ता समतोल हा भारत आणि चीन यांच्यात राहिला पाहिजे. चीनची एकाधिकारशाही आणि साम्राज्यवादी भूमिका आशियातील शांततेला आव्हान आहे. हे लक्षात घेऊन पाश्चात्य जगताने भारताला बळकट करण्याची गरज आहे.
(हा लेख तयार करण्यासाठी नेटवरील विविध स्त्रोतांमधील माहितीचा आधार घेण्यात आला आहे.)
Saturday, September 26, 2009
भारत-चीनमध्ये युद्ध होईल काय?
भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे काय? आंतरराष्ट्रीय अभ्यासकांची मते लक्षात घेता अशी शक्यता आहे, पण ती अंधुक. अभ्यासकांच्या मते, भारत-पाकिस्तान संबंधात चीनचा हस्तक्षेप, तिबेटमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि उभय देशातील अद्यापही न मिटलेला सीमाप्रश्न या तिन्ही किंवा यापैकी एका मुद्यावरूनही दोन्ही देशांत युद्ध होऊ शकते.
भारत-पाक युद्ध झाल्यास चीन यात हस्तक्षेप करेल हे उघड आहे. कारण दक्षिण आशियात भारत आणि पाक असा सत्तेचा समतोल राखणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पाकचे पारडे कमी पडतेय हे लक्षात आले की त्याला आधार द्यायचे चिनी धोरण आहे.
भारत चीनकडे व्यूहात्मक दृष्ट्या लक्ष देतोय असं म्हटल्यावर ते लक्ष दूर करण्यासाठी पाकिस्तान सक्षम आहे. म्हणूनच चीनला भिडलेल्या पूर्व सीमांवरून भारताला पश्चिम सीमांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी लागणार्या आगळिकीही या देशाकडून सातत्याने केल्या जात आहेत. म्हणूनच आपण नेहमीच चीनपेक्षा पाकिस्तानकडे जास्त लक्ष देत आहोत. दुर्देवाने चीनकडे दुर्लक्ष करत आहोत. आपले परराष्ट्रधोरण पाकिस्तानभोवतीच घुटमळत राहिल्याने भारताची शक्तीही मर्यादीत झाली आहे. किंबहूना भारताला दक्षिण आशियापुरताच तेही उपखंडापुरताच मर्यादीत ठेवण्याचा चीनचा मनसुबाही यशस्वी ठरला आहे. चीनप्रमाणेच आशियाई किंवा जागतिक पातळीवर एक बडा खेळाडू म्हणून पुढे येण्याचे भारतीय मनसुबे पाकिस्तानी कारवायांनी हाणून पाडले आहेत. त्यामुळे आशियातील चीन हीच एकमेव शक्ती म्हणून पुढे येते आहे.
भारताला डोकं वर काढू देऊ नये म्हणून चीनने कायम पाकिस्तानला मोठे करण्याचा मार्ग अंगीकारला. पाकच्या लष्करी विकासाला, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला आणि अंतिमतः अण्वस्त्रसज्ज होण्याला चीननेच सहकार्य केले. १९७४ मध्ये भारताने अणू चाचणी केल्यानंतर चीनने पाकला त्यासाठी प्रेरीत केले. त्यासाठी लागणारी सर्व मदत पुरवली. आता भारताबरोबर पाकही अण्वस्त्रसज्ज देश बनला आहे. त्यामुळे चीनला अपेक्षित दक्षिण आशियातील सत्तासमतोलही साधला गेला आहे.
अशा वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्द झाल्यास चीन हस्तक्षेप करेल काय? याची शक्यता कमीच वाटते. त्याऐवजी चीन पाकला लष्करी साहित्य आणि राजकीय पाठिंबा देईल. शिवाय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, जपान आणि इतर देशांच्या मदतीने भारतावर पाकविरोधातील युद्ध थांबविण्यासाठी दबाव आणेल. त्यामुळे उपखंडातील परिस्थिती 'जैसे थे' राहू शकेल.
अर्थात, अशाही परिस्थितीत भारत या दबावाला बळी न पडता, वर्षानुवर्षे भिजत पडलेला पाकिस्तान प्रश्न एकदाच काय तो सोडवायचा या हेतूने आग्रही राहिल्यास मात्र चीन नक्कीच हस्तक्षेप करेल. पण याचे स्वरूप वेगळे असेल. त्यासाठी चीन सैन्याची हालचाल करून ते भारताच्या सीमेपर्यंत आणून ठेवेल. उभय देशातील संबंधात तणाव निर्माण होईल असे काही करेल. उभय देशांच्या सीमेवर तणाव वाढविण्यासाठी आगळीक करेल. त्यामुळे सहाजिकच भारताला पश्चिमेकडून आपले लक्ष पूर्वेकडे हटवावे लागेल.
त्यानंतरही भारताने धूप न घातल्यास मग मात्र चीन भारताशी युद्ध पुकारून दक्षिण आशियातील सत्तासमतोल राखण्यसाठी थेट कारवाई करेल. अर्थात, हे एवढे सोपे नाही. ही घडेल त्यावेळी चीनही सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच मगच कोणतेही पाऊल उचलेल. आपल्या हस्तक्षेपाचे काय परिणाम होतील याची काळजी चीनलाही करावी लागेल. भारत-पाक युद्धातील प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि भारतीय लष्कराची ताकद नेमकी किती आहे, याचा अंदाज आल्यानंतरच चीन कोणतेही पाऊल उचलेल हे नक्की.
शिवाय त्यावेळी अमेरिका आणि पाश्चात्य जगतही शांत बसणार नाही. चीनने भारतावर हल्ला केल्यास तेही चीनची कोंडी करू शकतात. त्यावेळी चीनला या सगळ्यांना आपल्या बाजूने वळविणे अवघड जाईल. शिवाय भारताचे राजनैतिक कौशल्यही पणास लागेल. यात अमेरिकने बघ्याची भूमिका घेऊन चीनच्या कारवायांबाबत काहीच भूमिका न घेतल्यास अर्थातच चीन भारतावर हल्ला करेल.
तिबेटप्रश्नावरून चीन आणि भारत यांच्यात युद्ध होण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाहीये. त्यातच चीनने तिबेटमध्ये हान वंशीय लोकांचे जाणीवपूर्वक स्थलांतर करवून आणल्यामुळे तिबेटींची संख्या त्यांच्याच प्रांतात कमी झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र तिबेटसाठी सुरू असलेल्या चळवळींनाही आता फारसा अर्थ उरलेला नाही.
सीमाप्रश्नावरून चीन आणि भारत यांच्यात युद्ध होण्याची शक्यता दुस्तर वाटते. अरूणाचल प्रदेश हा आपला प्रदेश असल्याचे चीनचे मत आहे. भारताने हा भाग बळकावल्याचे चीनचे म्हणणे आहे. हा भाग पुन्हा मिळविण्यासाठी चीन युद्ध करेल याची शक्यता खूपच कमी वाटते.
या प्रश्नावरून जाहिररित्या बोलणे चीन टाळते. पण राजनैतिक स्तरावर यावर चर्चा होते.
चीन एकीकडे अरूणाचल प्रदेशवर दावा करत असताना अक्साई चीन हा आपला भाग असल्याचे भारताचे म्हणणे आहे. १९६२ च्या युद्धात चीनने हा भाग बळकावल्याची भारताची तक्रार आहे. हा भाग भारताला देणे चीनला परवडणारे नाही. कारण पश्चिम तिबेट नियंत्रणात राखण्यासाठी चीनला हा भाग आपल्याकडे असणे गरजेचे आहे. या भागातून रस्ते तयार करून तिबेट ताब्यात राखणे चीनला शक्य आहे. तरीही हा भाग चीन सोडू इच्छित असल्यास त्या मोबदल्यात त्यांना पूर्वेकडील काही भाग द्यावा लागेल.
पण भारताने पूर्व भाग दिल्यास आणखी एक गोची होऊ शकते. अरूणाचल प्रदेशातील तवांग आणि तिबेटमधील चुंबी या दरम्यान असलेले भूतानही चीन आपल्या घशात घालेल. भूतानचे लष्करी संरक्षण करण्याची जबाबदारी भारताची आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी का होईना भारताला चीनशी युद्ध पुकारावे लागेल.
त्यामुळे एकुणातच सीमाप्रश्न हा तसाच ठेवण्यास उभय देश प्राधान्य देतील असे वाटते.
आता उभय देशांच्या सैन्यांकडून परस्परांच्या देशात घुसखोरी, पेट्रोलिंग करताना इकडे तिकडे जाणे, रस्ता चुकणे हे प्रकार घडतात. पण त्यातून युद्ध होईल असे वाटत नाही. दोन्ही देशांची सरकारेच तसे घडू देणार नाहीत. सुमदुरोंग चू च्या मुद्यावरून १९८७ मध्येही असेच घडले होते.
अर्थात, म्हणून सीमाप्रश्नावरून या देशांमध्ये तणातणी रहाणारच नाही, असे नाही. कारण ईशान्य भारत हा दिसायला चिंचोळी पट्टी असला तरी बराच मोठा भूभाग आहे. भारताच्या सीमेपलीकडे चीन मजबूत आहे. त्यामुळे सीमाप्रश्नावरून युद्ध झाल्यास भारतासाठी मोठा धक्का म्हणजे त्याला पूर्वेकडील भाग गमवावा लागू शकेल. पण त्याचवेळी हा सीमाप्रश्न सुटल्यास भारतावर दबाव आणण्याचे चीनचे शस्त्रच बोथट होईल. अरूणाचल प्रदेशच्या मुद्यावरून भारताला धमक्या देणे आणि त्याचवेळी पाकिस्तानला सर्वबाबतीत मदत करणे असा 'समतोल' चीन आतापर्यंत साधत आहे. हा समतोल त्यानंतर बिघडून जाईल. भारतावर दबाव टाकण्याचा मुद्दाच हातातून निसटून जाईल. त्यामुळे चीन असे काही करेल असे वाटत नाही.
थोडक्यात काय, तर चीन आणि भारत यांच्यात जुंपू नये म्हणून पाक तिकडे कारवाया करत राहिल आणि पाकिस्तानशी भारत भिडू नये यासाठी चीनच्या पूर्वोत्तर बाजूलाही आगळिकी अधून मधून चालूच रहातील.
थोडक्यात दक्षिण आशियातील सत्तासमतोल राखण्यासाठीचा हा चिनी फॉर्म्युला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)